Ranji Trophy Final Mumbai vs Vidarbha : मुंबईने जिंकली रणजी ट्रॉफी, विदर्भ संघाचा १६९ धावांनी पराभव

Ranji Trophy Final Mumbai vs Vidarbha : मुंबईने जिंकली रणजी ट्रॉफी, विदर्भ संघाचा १६९ धावांनी पराभव

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : विदर्भ संघाचा १६९ धावांनी पराभव करत मुंबई संघाने आज ( दि. १४ मार्च )  रणजी ट्रॉफी २०२३-२४वर आपलं नाव कोरलं. मुंबई संघाने ४२ वेळा रणजी ट्रॉफी जेतेपद पटकविण्‍याचा पराक्रम केला आहे. यंदाच्‍या अंतिम सामन्‍यात पहिल्‍या डावात शार्दुल ठाकूरने मुंबईला सावरले. तर दुसर्‍या डावात मुशीरचे दमदार शतक, कर्णधार अजिंक्‍य राहणेची संयमी खेळीमुळे मुंबईने विदर्भासमोर विजयासाठी ५३८ धावांचे आव्‍हान ठेवले होते. या विशाल लक्ष्‍याचा पाठलाग करताना विदर्भाच्‍या करुण नायर, हर्ष दुबेची आणि कर्णधार अक्षय वाडकर यांनी झुंझार फलंदाजीचे प्रदर्शन घडवले. मात्र अखेर त्‍यांची झूंज अपयशी ठरली आणि तिसर्‍यांदा रणजी ट्रॉफी जिंकण्‍याचे विदर्भाचे स्‍वप्‍न भंगले. ( Ranji Trophy Final Mumbai vs Vidarbha )

Ranji Trophy Final : लंचनंतर मुंबईचे वर्चस्‍व,वाडकर-दुबेची झूंज व्‍यर्थ

सामन्‍याच्‍या अंतिम दिवशी लंचनंतर मुंबईचे वर्चस्‍व गाजवले. लंचनंतर पाचव्‍या दिवशी मुंबईला पहिले यश मिळाले. कर्णधार अक्षय वाडकर याला मुंबईच्‍या फिरकीपटू तनुष कोटियनने पायचीट केले. वाडकरने १९९ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकार लगावत  झुंझार १०२ धावांची खेळी केली.कर्णधार वाडकर पाठोपाठ हर्ष दुबेही बाद झाला. त्‍याला तुषार देशपांडेने शम्‍स मुलाणी करवी झेलबाद केले. त्‍याने १२८ चेंडूचा सामना करत ६५ धावा केल्‍या. वाडकर-दुबेची झूंज व्‍यर्थ ठरली असली तरी या दोघांच्‍या झुंजार भागीदारीमुळे चौथ्‍या डावात ३५०हून अधिक धावा करण्‍याचा नवा विक्रम विदर्भ संघाच्‍या नावावर नोंदला गेला आहे. वाडकर आणि दुबे बाद झाल्‍यानंतर विदर्भाचे उर्वरीत फलंदाज झटपट बाद झाले आणि मुंबईने १६९ धावांनी विजय मिळवला. ( Ranji Trophy Final Mumbai vs Vidarbha )

मुंबईने आठ वर्षांचा विजयाचा दुष्‍काळ संपवला

या शतकातील १४ वर्षांमध्‍ये मुंबईने रणजी ट्राॅफीची सात जेतेपदे जिंकली आहेत. तर केवळ ६ वेळा विजेतेपदाचा सामना गमावला हाेता. यंदा मुंबईच्‍या संघात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची मांदीयाळी होती. कर्णधार अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकूर यांच्यासह  दिग्‍गज खेळाडू संघात  होते. तर विदर्भाने विरोधी संघांवर वर्चस्व गाजवत अंतिम सामन्‍यापर्यंत धडक मारली होती. मागील आठ वर्षांपासून मुंबईला जेतेपदाचा दुष्काळ संपवत आला नव्‍हता. मुंबईने २०१६ मध्ये शेवटची ट्रॉफी जिकंली होती. आता तब्‍बल आठ वर्षानंतर मुंबईने पुन्‍हा एकदा रणजी ट्रॉफीमध्‍ये आपणच किंग असल्‍याचे सिद्‍ध केले. मात्र विदर्भाने दिलेली झूंजही क्रिकेटचा आनंद व्‍दिगुणित करणारी ठरली. ( Ranji Trophy Final Mumbai vs Vidarbha )

मुंबई रणजी ट्राॅफी @ 42

महाराजा रणजित सिंग यांच्या नावाने खेळल्या जाणाऱ्या ट्रॉफीचा पहिला हंगाम १९३४-३५ मध्ये झाला. तेव्हापासून मुंबईने ४१ वेळा विजेतेपद पटकावले होते. तर विदर्भ संघाने आतापर्यंत या ट्रॉफीवर दोनदा नाव कोरलं होते. यंदाच्‍या अंतिम सामन्‍यात मुंबई संघाची मजबूत पकड पाहायला मिळाली. मात्र पहिल्‍या डावात ढेपाळलेल्‍या विदर्भ संघाने दुसर्‍या डावात चिवट झूंज दिली. संघाचे सलामीवीर पुन्‍हा अपयशी ठरल्‍यानंतर करुण नायर आणि कर्णधार अक्षय वाडकर यांनी झुंझार फलंदाजीचे प्रदर्शन करत पाचव्‍या दिवसापर्यंत विदर्भाचे आव्‍हान जिंवत ठेवले होते. अखेर पाचव्‍या दिवशी दुसर्‍या सत्रात मुंबईच्‍या गाेलंदाजींनी ५ विकेट मिळवत रणजी ट्राॅफीवर आपलं नाव काेरलं.  ( Ranji Trophy Final Mumbai vs Vidarbha )

विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरचे दुसर्‍या डावात झुंझार शतक

अंतिम दिवसाच्‍या पहिल्‍या सत्रात कर्णधार वाडकर याने हर्ष दुबेच्‍या साथीने कडवी झुंज कायम ठेवली. त्‍यांच्‍या शतकी भागीदारीच्‍या जाोरावर  लंचपर्यंत विदर्भ संघाने ३३३ धावांपर्यंत मजल मारली. लंचनंतर खेळ सुरु झाल्‍यावर अक्षय वाडकर याने आपले शतक पूर्ण केले. त्‍याने १९५ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकार फटकावत स्‍मरणीय शतकाची नाेंद आपल्‍या नावावर केली . ( MUM vs VID Ranji Final Day 5 )

विदर्भाच्‍या दुसर्‍या डावात चिवट फलंदाजी

विदर्भने बुधवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी बिनबाद 10 च्या पुढे खेळायला सुरुवात केली. 19 व्‍या षटकात विदर्भला पहिला धक्का अथर्व तायडेच्या रूपाने बसला. त्याला शम्‍स मुलाणीने पायचीत केले. तायडेने 64 चेंडूत 4 चौकार फटकावत 32 धावा केल्‍या. यानंतर 20 व्या षटकात 65 धावांवर विदर्भाला दुसरा धक्‍का बसला. ध्रुव शौरे क्रीजवर थांबून मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. तो 28 धावांची इनिंग खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला तनुषने क्‍लीनबोल्‍ड केले. उपाहाराअखेर विदर्भाने या 2 खेळाडूंच्या मोबदल्यात 104 धावा केल्या.

विदर्भच्‍या नायर-वाडकर यांची संघर्षपूर्ण भागिदारी

ध्रुव शोरे बाद झाल्यानंतर आलेला अमन मोखाडेही संघाला संकटातून बाहेर काढू शकला नाही आणि तो 32 धावा करून बाद झाला. मधल्या फळीतील फलंदाज यश राठोडला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तो 7 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. 133 धावांवर विदर्भाने चार विकेट गमावल्या होत्या. अडचणीत सापडलेल्या विदर्भने चौथ्या दिवसाच्या चहापानाच्या वेळेपर्यंत 4 गडी गमावून 155 धावा केल्या होत्या.कठीण काळात अनुभवी करुण नायरने प्रथम श्रेणी कारकिर्दीतील 31वे अर्धशतक झळकावले. मुंबईच्या भक्कम गोलंदाजीसमोर त्याने चिवट फलंदाजीचे प्रदर्शन केले. मात्र, तो शेवटच्या सत्रात 74 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या डावात 220 चेंडूंचा सामना केला. त्याने कर्णधार अक्षय वाडकरसोबत पाचव्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी केली. यानंतर वाडकरने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि विकेट हर्ष दुबेच्या साथीने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत विकेट पडू दिली नाही. वाडकर 56 तर दुबे 11 धावा करून नाबाद परतले.

मुंबईचा दुसरा डाव, मुशीरचे दमदार शतक

पृथ्वी शॉ 11 धावा, भूपेन लालवाणी 18 धावा, अजिंक्य रहाणे 73 धावा, श्रेयस अय्यर 95 धावा, हार्दिक तामोर 5 धावा, मुशीर खान 136 धावा, शार्दुल ठाकूर शून्य, तनुष कोटियन 13 धावा करून बाद झाले.यानंतर अखेर शा. मुलानी 50 धावा केल्या. धावांची नाबाद खेळी खेळली. तर शार्दुल ठाकूरला खातेही उघडता आले नाही. तनुष कोटियनने 13, तुषार देशपांडेने 2 धावा केल्या.

विदर्भाचा पहिला डाव

शार्दुल ठाकूरने ध्रुव शौरेला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याला खातेही उघडता आले नाही. तर धवल कुलकर्णीने अमन मोखाडे आणि करुण नायरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अमन आठ धावा करून बाद झाला. त्याचवेळी करुणला खातेही उघडता आले नाही. विदर्भाने तीन गड्यांच्या मोबदल्यात 31 धावांवर दुसर्‍या दिवशी खेळण्यास सुरुवात केली आणि पहिला धक्का अथर्व तायडेच्या रूपाने बसला. धवल कुलकर्णीने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अथर्वला 23 धावा करता आल्या.यानंतर शम्स मुलाणी यांचा कहर पाहायला मिळाला. त्याने आदित्य ठाकरे, अक्षय वाडकर आणि हर्ष दुबे यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आदित्यला १९, अक्षयला पाच आणि हर्षला एक धाव करता आली. यानंतर तनुषने तीन गडी बाद करत विदर्भाचा डाव गुंडाळला. त्याने यश राठोड (27), यश ठाकूर (16) आणि उमेश यादव (2) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यश राठोडने सर्वाधिक धावा केल्या. मुंबईकडून शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळणाऱ्या धवल कुलकर्णीने तीन बळी घेतले. त्याचवेळी शम्स मुलानी आणि तनुष कोटियन यांनीही प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. शार्दुलला एक विकेट मिळाली.

शार्दुल ठाकूरची झूंजार खेळी, मुंबईचा पहिला डाव 224 धावांवर आटोपला

मुंबईची सुरुवात चांगली झाली. पृथ्वी शॉ आणि भूपेन लालवानी यांनी पहिल्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. यश ठाकूरने ही भागीदारी तोडली. त्याने भूपेनला अक्षयकरवी झेलबाद केले. त्याला 37 धावा करता आल्या. यानंतर हर्ष दुबेने पृथ्वीला क्लीन बोल्ड केले. त्याला 46 धावा करता आल्या. या दोन विकेट्सनंतर विकेट्सची झुंबड उडाली. मुशीर खान सहा धावा करून बाद झाला, कर्णधार अजिंक्य रहाणे सात धावा करून, श्रेयस अय्यर सात धावा करून आणि हार्दिक तामोरे पाच धावा करून बाद झाला. मुंबईच्‍या पहिल्‍या डावात शार्दुल ठाकूरच्‍या ७५ धावा निर्णायक ठरल्‍या. शम्स मुलानी 13 धावा करून बाद झाला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news