मुंबई-गोवा जलमार्गावर क्रूझ सेवा

मुंबई-गोवा जलमार्गावर क्रूझ सेवा

Published on

पणजी; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा-मुंबई या जलमार्गावर क्रूझ सेवा लवकरच आता उपलब्ध होणार आहे. येत्या 18 तारखेपासून ही सेवा सुरू होत आहे. देशातील हे पहिले लक्झरियस क्रूझ असल्याने जलवाहतुकीचा अतिउच्च सेवेद्वारे अनुभव घेता येणार आहे. देशात अशा सेवेचा लाभ घेणारा वर्ग निर्माण होत असल्याने त्यासाठी भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी) आंतरराष्ट्रीय क्रूझ सेवा देणार्‍या कोर्डेलिया क्रूझ या खासगी कंपनीशी करार केला आहे.

आयआरसीटीसीने केलेल्या कराराच्या माध्यमातून मुंबईपासून गोवा, कोची, दीव, लक्षद्वीप आणि श्रीलंका अशा चार ठिकाणी पर्यटक क्रूझ सेवा येत्या 18 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. जलवाहतुकीद्वारे पर्यटक सेवेत कार्यरत असलेल्या कोर्डेलिया क्रूझ या कंपनीशी आयआरसीटीसीने करार केल्याने अनेक पर्यटकांना अतिउच्च दर्जाचा जलवाहतुकीचा अनुभव घेता येणार आहे. या सेवेतील क्रूझ 18 रोजी मार्गस्थ होणार असून, त्यासाठीचे तिकीट बुकिंगही सुरू झालेले आहे. सार्वजनिक क्षेत्रीय विभागाच्या माध्यमातून ही पर्यटन सेवा सुरू होत असल्याचे आयआरसीटीसी या कंपनीचे म्हणणे आहे.

अशा असतील सुविधा

सध्या मुंबई-दीव-मुंबई, मुंबई-अ‍ॅट सी-मुंबई, मुंबई-गोवा-मुंबई, कोची-लक्षद्वीप अशा मार्गावर हे जहाज जाणार आहे. त्यामुळे या सेवेत पर्यटकांना जहाजावरील विविध सुविधांचा लाभ घेता येणार आहे. त्यामध्ये रेस्टॉरंट, खुले थिएटर, बार, थिएटर, व्यायामशाळा, मुलांसाठी तलाव अशा सुविधा असणार आहेत.

पहिल्या टप्प्यात मुंबईत

पहिल्या टप्प्यात या कंपनीची पहिली सेवा मुंबईमध्ये सुरू होत आहे. देशी पर्यटकांसीठी ती असणार आहे. त्यानंतर मे 22 मध्ये हे लक्झरी जहाज तामिळनाडूमधील चेन्‍नई येथे स्थलांतर होईल. त्यानंतर तेथून ते कोलंबो, गॅले, जाफना व त्रिंकोमाली या श्रीलंकेतील ठिकाणी आंतरराष्ट्रीय प्रवास करणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news