BMC Budget : मुंबई महानगरपालिकेचा २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर

मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर
मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा मुंबई महानगरपालिकेचा 2024-25 चा 59 हजार 954 कोटी 75 लाख रुपयाचा अर्थसंकल्प पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी पालिका प्रशासक इकबाल सिंह चहल यांना सादर केला. यावेळी मुंबईच्या विकासासाठी तब्बल 31 हजार 774 कोटी 59 लाख रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात आली.

यात सर्वाधिक 4 हजार 250 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद कोस्टल रोडसह उत्तर वरसावा ते दहिसर व दहिसर ते भाईंदर लिंक रोडसाठी करण्यात आलेली आहे.

राज्य शासनाकडे अतिरिक्त चटईक्षेत्र अधिमूल्याची मागणी

अतिरिक्त ०.५० चटई क्षेत्रापोटी प्राप्त होणाऱ्या महसूलाच्या २५ टक्के ऐवजी ७५ टक्के तसेच फंजीबल चटईक्षेत्रापोटी प्राप्त होणाऱ्या महसूलाच्या ५० टक्के ऐवजी ७० टक्के हिस्सा मुंबई महानगरपालिकेस मिळणे आवश्यक आहे.

चटईक्षेत्र अधिमूल्यापोटी अपेक्षित असलेल्या महसूलातील महानगरपालिकेस मिळणे आवश्यक असलेला हिस्सा राज्य शासनाने विचारात घ्यावा, याकरीता पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचे अर्थसंकल्पात आयुक्तांचे सूतोवाच…

मुंबई बाहेरुन येणाऱ्या रुग्णांसाठी स्वतंत्र शुल्क !

मुंबई महानगरपालिकेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यांतील रुग्णांना सुध्दा उत्तम आरोग्य सेवा पुरविल्या जातात. मुंबईकरांकडून प्राप्त होणाऱ्या कर व शुल्कातून पालिका आरोग्य सेवेवर मोठ्या प्रमाणात खर्च करत असल्याने महाराष्ट्राबाहेरुन उपचारासाठी येणाऱ्या लोकांसाठी स्वतंत्र शुल्क रचना लागू करण्याबाबत विचार करणे आवश्यक असल्या तर पालिका आयुक्तांनी अर्थसंकल्पात स्पष्ट केले.

मलनिःसारण आकार व जल आकार वाढणार

1 एप्रिल 2015 पासून जल देयकामध्ये मलनिःसारण आकार हे जल आकाराच्या 70 टक्के आकारण्यात येतात. परंतु मलजल प्रक्रिया केंद्र प्रकल्पावरील प्रत्यक्ष वाढता खर्च भागविण्यासाठी मलनि:सारण आकार यामध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत पुनरावलोकन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे, बांधिव क्षेत्रावर आकारले जाणारे अतिरिक्त मलनिःसारण आकार व जल आकार यामध्ये सुधारणा करण्यासाठी आर्थिक सर्वेक्षण केले जाणार, त्यामुळे पाणीपट्टीमध्ये अजूनच वाढ होणार आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news