मुंबईच्या राहुल चाहर कडून विकेट घेतल्यावर असभ्य वर्तन

मुंबईच्या राहुल चाहर कडून विकेट घेतल्यावर असभ्य वर्तन

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यातील सामना आरसीबीने ५४ धावांनी जिंकला. सामन्यादरम्यान, राहुल चाहर आपल्या असभ्य वर्तनामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीने २० षटकात ६ बाद १६५ धावा केल्या. त्यात विराट कोहलीचे ५१ तर ग्लेन मॅक्सवेलचे ५६ धावांचे मोठे योगदान होते. मुंबईकडून बुमराहने ३ तर राहुल चाहर, मिलने आणि बोल्ट यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

पांड्याकडून विराटला जीवनदान

राहुल चाहरने ४ षटकात ३३ धावा देत श्रीकार भारतची एकमवे विकेट घेतली. मात्र राहुल चाहर विकेट घेतल्यानंतर ज्या पद्धतीने रिअॅक्ट झाला त्यावरुन वाद निर्मण होण्याची शक्यता आहे. ज्यावेळी विराट कोहली आणि श्रीकार भारत फलंदाजी करत होते. त्यावेळी मुंबईने राहुल चाहरकडे गोलंदाजी करण्यासाठी चेंडू सोपवला.

यादरम्यान, राहुल चाहरच्या गोलंदाजीवर ९ व्या षटकात हार्दिक पांड्याने विराट कोहलीचा झेल सोडला. त्यामुळे चाहरला राग आला होता. कारण या चेंडूपूर्वी विराटने चाहरला षटकार मारला होता. मात्र पुढच्याच चेंडूवर हार्दिकने झेल सोडला. ज्यावेळी हार्दिकने झेल सोडला त्यावेळी विराटने एक धाव घेतली आणि स्ट्राईक श्रीकार भारत याच्याकडे आले.

षटकार मारल्याने चाहर झाला रागाने लाल

श्रीकार भारतनेही चाहरला षटकार मारला. त्यामुळे आधीच चिडलेला राहुल अजूनच रागाने लाल झाला. मात्र त्याने पुढच्या चेंडूवर भारतला आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवत सूर्यकुमार यादवकडे झेल देण्यास भाग पाडले. सूर्यकुमार यादवनेही हार्दिकचा कित्ता न गिरवता झेल अलगद पकडला.

या विकेटनंतर राहुल चाहर स्वत:वर नियंत्रण ठेवू शकला नाही. त्याने फलंदाज भारतकडे पाहून आक्षेपार्ह हावभाव केले. त्याच्या या कृतीची क्रिकेट जाणकार आणि चाहत्यांनी निंदा केली आहे. राहुल चाहरला या सामन्यात फक्त १ विकेट घेण्यात यश आले.

दुसऱ्या बाजूला आरसीबीच्या हर्षल पटेलने हॅट्ट्रिक करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याने १७ धावा देत ४ विकेट मिळवत मुंबई इंडियन्सचा डाव १११ धावात संपुष्टात आणला. या विजयामुळे आरसीबीचे १० सामन्यात १२ गुण झाले आहेत. त्यांच्या प्ले ऑफमध्ये खेळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

[box type="shadow" align="" class="" width=""][visual_portfolio id="40771"][/box]

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news