Goregaon Fire : आगीत गंभीर जखमी झालेल्या ३ रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले

Mumbai Goregaon Fire
Mumbai Goregaon Fire

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील गोरेगावमध्ये एका इमारतीला लागलेल्या आगीत ७ जणांचा होरपळून मृत्‍यू झाला आहे तर ४६ जण जखमी झाले आहेत. (Goregaon Fire) यातील गंभीर जखमी झालेले ३ रुग्ण सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. (Goregaon Fire)

संबंधित बातम्या –

मुंबईतील गोरेगाव येथील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. जखमी झालेल्यांपैकी ३९ जणांना एचबीटी आणि कपूर रूग्‍णालयात भरती करण्यात आले आहे. दरम्‍यान, अग्‍निशमन दल आणि पोलिस घटनास्‍थळी दाखल झाले आहेत. ३० पेक्षा अधिक दुचाकी आणि ४ कार जळून खाक झाल्या आहेत. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले-

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेनंतर आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे,"गोरेगाव येथे लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल जाणून दुःख झाले. आम्ही बीएमसी आणि मुंबई पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत आणि सर्व मदत केली जात आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news