मुंबई : प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांनी २३ व्या मजल्यावरून उडी घेऊन जीवन संपवले

संग्रहित
संग्रहित

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पारस पोरवाल यांनी राहत्या इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवले. ही धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली. या घटनेची नोंद करत काळाचौकी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, पोरवाल यांनी व्यवसायात झालेल्या आर्थिक तोट्यातून जीवन संपविण्याचे हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोरवाल हे चिंचपोकळी रेल्वे स्थानकाजवळील इमारतीमध्ये राहात होते. गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास त्यांनी इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून उडी घेतली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. ही माहिती मिळताच काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. यात पोलिसांना पोरवाल यांनी लिहिलेली एक नोट सापडली आहे.

पोरवाल यांच्या स्वतःच्या व्यायामशाळेच्या खोलीत एक सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे. त्यामध्ये पोरवाल यांनी त्यांच्या मरणाला कोणीही जबाबदार नसून कोणाचीही चौकशी करू नये, असे लिहिलेले आहे. त्यांनी लिहिलेली नोट नातेवाईकांनी ओळखली आहे. याबाबत कोणावरही संशय व्यक्त करण्यात आला नसून कुटुंबियांची कोणतीही तक्रार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news