इन्स्टाग्रामवरील ओळख अल्पवयीन मुलीच्या आली अंगलट

इन्स्टाग्रामवरील ओळख अल्पवयीन मुलीच्या आली अंगलट
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा :  सोशल मीडियाच्या आकर्षणातून कुर्ल्यातील १४ वर्षीय मुलीला इन्स्टाग्रामवर खाते उघडणे चांगलेच अंगाशी आले आहे. एका तरुणाने इन्स्टाग्रामवर या मुलीशी ओळख वाढवत तिच्यावर प्रेम करत असल्याचे भासवले. ही मुलगी जाळ्यात अडकताच त्याने या मुलीशी अश्लील चाळे केले. तीला आत्महत्येची धमकी देऊन तीच्याकडून नग्न व्हिडीओ आणि फोटो काढून घेत शारीरिक संबंधांची मागणी केली. मुलीने नकार दिल्याने त्याने हे फोटो आणि व्हिडीओ मुलीच्या नातेवाईकाला पाठवून तिची बदनामी केल्याचा प्रकार कुर्ल्यात घडला आहे.

शिफॉन खान असे या तरुणाचे नाव असून पीडित मुलीच्या आईने त्याच्या विरोधात विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. २१ मे ते १९ जून या काळात घडलेल्या या घटनेप्रकरणी विनयभंग करणे, धमकावणे आणि बदनामी करणे या भादंवि कलमांसह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन विनोबा भावे नगर पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, पीडित मुलगी कुर्ला पश्चिम परिसरात राहते. यातील आरोपी शिफॉनने मुलीला इन्स्टाग्रामवर फ्रेंडरिक्वेस्ट पाठवून तिच्याशी ओळख केली. तिच्याशी मैत्री झाल्यानंतर शिफॉनने तिला प्रपोज केले. तिच्यावर मनापासून प्रेम करत असल्याचे सांगून शिफॉनने तिला भेटायला बोलावले. मुलगी भेटायला आल्यानंतर शिफॉनने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत शारीरिक संबंधांची मागणी केली.

मुलीने त्याला विरोध केला. अखेर शिफॉनने तिला एक चिठ्ठी लिहून आत्महत्येची धमकी देत मुलीला नग्न व्हिडीओ आणि फोटो पाठविण्यास भाग पाडले. शिफॉन हा मुलीकडे वारंवार शारीरिक संबंधांची मागणी करत होता. मुलीने त्याला नकार देत संपर्क तोडला. अखेर शिफॉनने मुलीने पाठविलेले फोटो आणि व्हिडीओ मुलीच्या नातेवाईकाला पाठवून तिची बदनामी केल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने पोलिसांत दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news