मुंबई : पुढारी वृत्तसेवा बीअरवरील उत्पादन शुल्कात वाढ केल्यानंतर बीअरच्या विक्रीत घट झाली. परिणामी, राज्य सरकारकडे जमा होणारा महसूलही कमी झाला. त्यामुळे बीअर उद्योगाच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीत जमा होणार्या महसुलात कशी वाढ करायची याच्या अभ्यासासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे.
त्यामुळे येत्या काळात बीअरचे दर कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
हेही वाचा :