मुंबई : भांडूपमधील श्रीराम महाविद्यालयात भीषण आग

महाविद्यालयात भीषण आग
महाविद्यालयात भीषण आग

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा भांडुप व्हिलेज रोड परिसरात असलेल्या श्रीराम महाविद्यालयाला आज (रविवार) सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी रेकॉर्ड रूमलाही आग लागली. यावेळी मोठ्या प्रमाणात धुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरले होते.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आज रविवारच्या सुट्टीच्या दिवशी ही आग लागल्यामुळे महाविद्यालयात कुणी नव्हतं त्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news