Mukhtar Ansari funeral: गॅगस्टर मुख्तार अन्सारीच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी

Mukhtar Ansari funeral
Mukhtar Ansari funeral
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: बांदा कारागृहात असलेला गॅगस्टर मुख्तार अन्सारीची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला कडेकोट बंदोबस्तात हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. दरम्यान त्याचा हृदयविकाराचा झटका आल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मुख्तार अन्सारी यांच्यावर आज (दि.३०) उत्तरप्रदेशातील गाझीपूरमधील मोहम्मदाबाद त्यांच्यावर अंत्यसंसस्कार करण्यात आले. तत्पूर्वी मुख्तार अन्सारीच्या अंत्ययात्रेत लोक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. (Mukhtar Ansari funeral)

मुख्तारवर सरकारने विष प्रयोग केल्याचा आरोप!

यूपीत सरकार सपचे असो, की बसपचे… मुख्यमंत्री मुलायमसिंह असू देत, की मायावती… मुख्तार अन्सारीसह यूपीवर माफिया टोळ्यांचा वरचष्मा कायम राहिलेला होता. मुंबईवर जसा दाऊद इब्राहिम या गुंडाचा दरारा होता, तसाच यूपीत अतीक अहमद असो, की मुख्तार अन्सारी… आपापल्या भागातून या माफियांचा एकछत्री अंमल होता. अतीक अहमदच्या खात्म्यासह त्याच्या टोळीची वाराणसी भागातील दहशतही संपुष्टात आली आहे. अतीक कारागृहात असतानाच संपला किंवा संपविण्यात आला. मुख्तारही कारागृहात असताना मरण पावलेला आहे. तो हृदयविकाराने नव्हे, तर विष प्रयोगामुळे मरण पावला, यंत्रणेचाच त्याच्या मृत्यूत हात आहे, असा आरोप मुख्तारचा मुलगा उमर याने उघडपणे केलेला आहे. त्यावरून मुख्तारच्या मृत्यूची चौकशीही सुरू झालेली आहे…

माझ्या पित्याचा खून : उमर

स्लो पॉईझनिंगने माझ्या पित्याचा खून झाला आहे. चौकशी व्हावी, अशी मागणी मुख्तारचा मुलगा उमर याने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. एमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांनीही मुख्तारच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यानुसार न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

मुख्तारचे गुन्हेगारी रेकॉर्ड

गँगस्टर मखानू सिंहच्या टोळीत तो सुरुवातीला सदस्य होता. 1990 मध्ये मुख्तारने स्वत:ची गँग बनविली. 61 गुन्हे मुख्तारविरुद्ध दाखल होते. 15 खून प्रकरणांत मुख्तार मुख्य आरोपी होता. ब्रजेश सिंह टोळीशी मुख्य स्पर्धा होती. मुन्ना बजरंगी हा यूपीचा कुख्यात गुंड मुख्तारचा पंटर होता. 2002 मध्ये बृजेशने मुख्तारचे 3 हस्तक मारले. बृजेशचे निकटवर्तीय म्हणून 2005 मध्ये भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्यासह 6 जणांचे हत्याकांड मुख्तारने घडवून आणले. एके-47 चा वापर त्यात झाला होता. कृष्णानंद राय यांनी 2002 मध्ये विधानसभा निवडणुकीत मुख्तार अन्सारीचा पराभव केला होता. तो जिव्हारी लागल्याने मुख्तार याने कारागृहातून हे हत्याकांड घडविले होते. नंतर राय हत्याकांडातील मुख्य साक्षीदार शशिकांत यांचाही संशयास्पद मृत्यू झाला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news