डेटींग अ‍ॅपवरील ओळखीतून मुंबईच्या तरूणीवर पुण्यात बलात्कार

file photo
file photo

पुणे : पुढारी वृत्तसेवा : डेटींग अ‍ॅपवरून ओळख झाल्यानंतर ती त्याच्या बोलण्याला भुलली आणि मुंबईतून पुण्यात आली खरी, मात्र तिला जेजुरीला नेऊन त्याने तीच्यावर बलात्कार केला. तसेच या प्रकाराबाबत कुणाला सांगितल्यास मारून टाकण्याची धकमी दिल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी महेंद्र उर्फ राववसाहेब भानुदास गायकवाड (वय 42, रा. मांजराई नगर, पुणे), संतोष पाटील (वय 40, रा कुर्दुवाडी चिखली, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोन्ही आरोपी फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय पिडीत महिलेची आरोपींशी टिकी या डेटींग अ‍ॅपवरून काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती. आरोपींनी तीच्याशी संवाद वाढवून तिचा विश्वास संपादन केला. याचा फायदा घेऊन दोघांनी तीला जेजुरीला जाण्यासाठी पुण्यात बोलावून घेतले. यावेळी कारमधून जात असतांना आरोपी संतोष तिच्याशी जबरदस्तीने लगट करू लागला. याला पिडीतेने विरोध केला.

यानंतर महेंद्र गायकवाडने फिर्यादीला त्याच्या मित्राच्या फ्लॅटवर नेत तीच्यावर बलात्कार केला. या सोबतच पुन्हा शरिर संबंध ठेव, नाही तर मारून टाकेन अशी धमकीही दिली. यानंतर पिडीतेने हडपसर पोलिस ठाणे गाठत पोलिसांपुढे सर्व हकिकत सांगितली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news