Motivational Video : गायींच्या झुंडीला भिडला एकटा हंसपक्षी!!!

Motivational Video : गायींच्या झुंडीला भिडला एकटा हंसपक्षी!!!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात. त्याच्या अधिकृत ट्विटरवरून ते नवनवीन व्हिडिओ आणि माहिती शेअर करत असतात. त्यावर गमतीशीर प्रतिक्रियादेखील येत असतात. सोमवारी त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरनू एक जुना व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये गायींच्या कळपाला एक हंस पक्षी टक्कर देताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेतात चित्रीत करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. (Motivational Video)

या व्हायरल व्हिडिओमध्ये काही गायी एका छोट्याशा हंस पक्षासोबत लढताना दिसत आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, गाय आणि हंस दोघांच्या टक्कर होत आहे. त्यात  हंस पक्षी गायींशी एकटा भिडताना दिसत आहे. एकटा हंस पक्षी गायींच्या कळपात मधोमध उभा आहे आणि सर्वांना एकटा लढताना दिसत आहे.

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शन दिलं आहे की, "या पक्षाचा उत्साह कसा आहे? उच्च प्रतिचा उत्साह दिसत आहे. या पक्षाचं धाडस हेच माझ्या सोमवारच्या कामाची प्रेरणा आहे." हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर आतापर्यंत ७ लाख लोकांनी पाहिलेला आहे. लोकांनी हंस पक्षाच्या आत्मविश्वासाचं कौतुक केलं आहे. (Motivational Video)

या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एक युजर्स म्हणतो की, "या व्हिडिओमधून हे लक्षात येतं की, आपल्या हिमतीचा शत्रूच्या आकाराशी काही संबंध नाही. तुमची हिम्मत तुमच्या मनातील आत्मविश्वास आणि दृढ संकल्पशी जोडलेली असते." दुसरा एक युजर्स म्हणतो की, "या व्हिडिओमधून खूप काही शिकता येतं."

हे वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news