सर्वाधिक शाकाहारी लोक भारतात!

सर्वाधिक शाकाहारी लोक भारतात!

वॉशिंग्टन : जगभरात शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे लोक असतात. अलीकडील काळात जगभरातच मांसाहाराचे प्रमाण प्रचंड वाढत चाललेले आहे. लोकांना मांसाहार अधिक आवडू लागला आहे. मांसाहारी व्यंजने अधिक रुचकर असतात, असा यामागील समज आहे. पण, काही देश असेही आहेत, जेथे शाकाहाराला सर्वोच्च प्राधान्य असते आणि शाकाहारी देशांच्या या यादीत अर्थातच भारत अव्वलस्थानी विराजमान आहे.

भारतात जास्त प्रमाणात लोक शाकाहारी आहेत. एका आकडेवारीनुसार, भारतात 38 टक्के लोक शाकाहारी आहेत. भारतानंतर मेक्सिकोचा क्रमांक लागतो. याठिकाणी 19 टक्के लोक शाकाहारी आहेत. या यादीत इस्रायल तिसर्‍या क्रमांकावर असून, तेथील 13 टक्के लोक शाकाहारी आहेत. दरम्यान, संपूर्ण जगाचा विचार केला, तर जास्त करून मांसाहारीच लोक सापडतील, असे या आकडेवारीवरून दिसून येते आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news