युरोपमधील सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखीचा उद्रेक

युरोपमधील सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखीचा उद्रेक

सिसिली : युरोपमधील सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखी म्हणून ओळखल्या जाणार्‍या इटलीतील माऊंट एटना ज्वालामुखी पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. या ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख अनेक किलोमीटरपर्यंत विखुरली गेली आहे. यामुळे प्रमुख शहर असलेल्या सिसिली शहरातील कटानिया विमानतळ बंद करण्यात आले आहे. याशिवाय या विमानतळाकडे येणारी विमाने दुसरीकडे वळविण्यात आली आहेत.

कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून तेथील प्रशासनाने पुढील 48 तासांसाठी मोटारसायकल व सायकलींच्या वापरावर बंदी घातली आहे; तर ताशी 20 कि.मी. वेगाने कार चालवली जाऊ शकते. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यापासूनच माऊंट एटना ज्वालामुखीचा स्फोट होण्याचे संकेत मिळत होते. कारण, ज्वालामुखीतून मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर पडू लागला होता.

माऊंट एटना हा युरोपमधील सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखी म्हणून ओळखला जातो. गेल्या मे महिन्यात तो जागृत झाला होता. यातून मोठ्या प्रमाणात लाव्हा आणि राख बाहेर पडत होती. यामुळेच परिसरातील तमाम विमानतळे बंद ठेवण्यात आली होती. 1981 मध्ये माऊंट एटनातील पूर्वोत्तर क्रेटरची उंची सुमारे 11 हजार फूट इतकी होती; पण 2018 मध्ये हीच उंची 10,912 फूट इतकी झाली होती. 2021 मध्ये माऊंट एटना सक्रिय झाला होता; तर सर्वात मोठा स्फोट 1992 मध्ये झाला होता. या ज्वालामुखीचा सर्वात पहिला स्फोट सुमारे पाच लाख वर्षार्ंपूर्वी झाला होता. तेव्हापासून सातत्याने माऊंट एटना ज्वालामुखीचे स्फोट होत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत होत असलेल्या स्फोटांमुळे हवाईसेवा प्रभावी होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news