Moscow Concert Hall Attack : ‘IS खोरासान’ किती धोकादायक? रशियावर दहशतवादी हल्ला का केला?
पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाची राजधानी मास्कोमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने जग हादरले आहे. या भ्याड हल्ल्यात ७० हून अधिक नागरिक ठार झाले आहेत तर १५० हून अधिक जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट-खोरासान या दहशवाती संघटनेने घेतली आहे. अशा प्रकारे रशियावर हल्ला होईल, असा इशारा यापूर्वी अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी दिला होता. तरीही आयएस-खोरासानने हा हल्ला केला. ( Moscow Concert Hall Attack ) जाणून घेवूया 'IS खोरासान'सह दहशतवादी हल्ल्यामागील कारणाविषयी…
केव्हा अस्तित्वात आली 'IS खोरासान' दहशतवादी संघटना?
अमेरिकेने सदाम हुसैनच्या पाडावासाठी इराकवर हल्ला केला. सदामला जेरबंद करण्यात आले. यानंतर प्रदीर्घ काळ युद्ध चालले. यामध्ये इराक पूर्णपणे बेचिराख झाला. अमेरिकेचे सैन्य इराकमधुन बाहेर पडताच अनेक दहशतवादी संघटना अस्तित्वा आल्या. यावेळी अल-कायदाचा म्होरक्याअबू बकर अल-बगदादी याने २००६ मध्ये इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) ही कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादी संघटना अस्तित्वात आणली. इराक ताब्यात घेण्यासाठी त्याने तोपर्यंत अल-कायदा इराकचे नाव बदलून इस्लामिक स्टेट ऑफ इराक असे ठेवले होते. आज रशियावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी आयएस-खोरासानने घेतली. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) ही कट्टरपंथी इस्लामिक या दहशतवादी संघटनेचीच ही एक शाखा आहे. २०१४ मध्ये पूर्व अफगाणिस्तानमध्ये ही दहशतवादी संघटनांनी अस्तित्वात आली. खोरासान या नावाने प्राचीन काळात एक प्रदेश होता. या प्रदेशात एकेकाळी उझबेकिस्तान, अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि इराकचा काही भाग समाविष्ट होता. सध्या हा अफगाणिस्तान आणि सीरियामधील भाग आहे. ISआयएसचे खोरासान गटात अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित वेगवेगळ्या विचारसरणी असलेल्या लोकांचा समावेश आहे. हा गट प्रामुख्याने सीरिया आणि खोरासानमधून चालवला जातो.
'IS खोरासान' किती धोकादायक ?
आयएस-खोरासानने यापूर्वीही अफगाणिस्तानमध्ये अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत. 2021 मध्ये, जेव्हा तालिबानचा ताबा घेतल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा काबुल विमानतळाबाहेर दोन आत्मघाती हल्ले झाले. या हल्ल्यांमध्ये अमेरिकन मरीन कमांडोसह किमान 60 लोक मारले गेले. पाच अमेरिकन सैनिकांसह 100 हून अधिक लोक जखमी झाले होते.
आयएस-खोरासानने मे २०२३ मध्ये अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील मुलींच्या शाळेत झालेल्या प्राणघातक स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती, ज्यामध्ये 68 लोक मारले गेले होते आणि 165 जखमी झाले होते. या दहशतवादी संघटनेने जून २०२३ मध्ये ब्रिटिश-अमेरिकन HALO ट्रस्टवरही हल्ला केला होता, ज्यात 10 ठार आणि 16 जखमी झाले होते.
रशियावर हल्ला का केला?
वॉशिंग्टनमधील सॉफन सेंटरचे कॉलिन क्लार्क यांनी 'रॉयटर्स'ला सांगितले की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सीरियाचे अध्यक्ष बशर असद यांच्या राजवटीला पाठिंबा देण्यासाठी रशियन सैन्य सीरियामध्ये पाठवले होते. पुतिन यांच्या या निर्णयाला ISIS ने कडाडून विरोध केला होता. सुरुवातीपासूनच आयएस-खोरासान या दहशतवादी संघटनेचा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना विरोध आहे. रशिया आपला शत्रू आहे या भावनेतून हा हल्ला झाला असावा, असेही ते म्हणाले.अमेरिकेतील परराष्ट्र धोरणाचे अभ्यास सॉफन सेंटरचे कॉलिन क्लार्क यांनी म्हटलं आहे की, " आयएस-खोरासान ही संघटना मागील दोन वर्षांपासून पुतीन यांच्याविरोधात भूमिका घेत आहे. रशिया जगभरात मुस्लिमांवर अत्याचार करणाऱ्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचा दावा ही संघटना करते.
हेही वाचा :