पुढारी ऑनलाइन डेस्क : Morocco Earthquake : मोरोक्को येथे शुक्रवारी (दि.8) रात्री उशिरा झालेल्या भूकंपात तब्बल 2800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आंतरराष्ट्रीय एजन्सीजच्या माहितीनुसार, मृतांचा आकडा 3000 च्या पुढे जाण्याची शक्यता आहे कारण दुर्गम भागात अद्यापही मदत पोहोचलेली नाही. तर 2562 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. भूकंपाच्या 58 तासानंतरही बचाव कार्य अजूनही सुरू आहे. अरम उजालाने ही आकडेवारी दिली आहे.
मोरोक्को शुक्रवारी रात्री गेल्या 60 वर्षातील शक्तिशाली भूकंपाने हादरले आहे. मोरोक्कोसह अन्य राष्ट्रांचे बचाव पथक देखील मदतीसाठी पुढे सरसावले आहे. बचाव कार्यासाठी स्पेन, ब्रिटेन आणि कतारचे बचाव पथक मोरोक्कोत दाखल झाले आहेत. भूकंपातून बचावलेल्या लोकांना अद्यापही रस्त्यावरच झोपावे लागत आहेत. जखमींवर उपचार सुरू आहे.
भूकंपात मृतांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मात्र, मृतदेहांना ठेवण्यासाठी देखील जागा नाही. याशिवाय लोकांनी भूंकपात शेकडो कुटुंबांनी आपले सर्वस्व गमावले आहे. सध्या तिथे बचावलेल्या लोकांना पुरेसे पिण्याचे पाणी, जेवण, वीज, कपडे या सर्वांचीच कमतरता आहे. त्यामानाने सरकारी मदत खूप कमी आहे.
36 वर्षीय यासीन नौमघर ने सांगितले, आम्ही सर्व काही गमावले आहे, आमचे घर आम्ही गमावले आहे. आमच्या सरकारने आमची मदत करावी अशी आमची विनंती आहेत.
या आपत्तीमुळे तीन लाखांहून अधिक लोक बाधित झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे. स्पेनने सांगितले की 56 अधिकारी आणि चार स्निफर कुत्रे मोरोक्कोमध्ये आले आहेत, तर 30 लोक आणि चार कुत्र्यांची दुसरी टीम तेथे जात आहे. ब्रिटनने सांगितले की ते 60 शोध आणि बचाव विशेषज्ञ आणि चार कुत्रे तसेच चार व्यक्तींचे वैद्यकीय मूल्यांकन पथक तैनात करत आहेत. कतारने असेही म्हटले आहे की त्यांचे शोध आणि बचाव पथक मोरोक्कोला रवाना झाले आहे.
हे ही वाचा :