पुढारी ऑनलाइन डेस्क : Morocco Earthquake : मोरोक्कोत झालेल्या शक्तशाली भूकंपात 2000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अल जझीराच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा मोरोक्को भूकंपाने हादरले होते. तुर्कीतील भूकंपानंतर हा सर्वात शक्तिशाली भूकंप मानला जात आहे. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे.
मोरोक्कोत शुक्रवारी रात्री 6.8 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंप 03:41:01 (UTC+05:30) वाजता 18.5 किमी खोलीवर झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू माराकेशच्या पश्चिमेला 72 किलोमीटरवर नोंदवला गेला. माराकेश हे शहर देशातील एक प्रमुख आर्थिक केंद्र आहे. यामध्ये आतापर्यंत 2012 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे तर 2059 लोक जखमी झाले आहे. तसेच अनेक जण बेघर झाले आहे. देशात अधिकाऱ्यांनी तीन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे.
सैन्याच्या निवेदनानुसार, मोरोक्कोचा राजा मोहम्मद सहावा यांनी सशस्त्र दलांना विशेष शोध आणि बचाव पथके आणि सर्जिकल फील्ड हॉस्पिटल तैनात करण्याचे निर्देश दिले. शुक्रवारी रात्री उशिरा मोरोक्कोच्या हाय अॅटलास पर्वतरांगांना हादरवणाऱ्या भूकंपामुळे मराकेशमधील ऐतिहासिक वास्तूंना भूकंपाचे नुकसान झाले होते, परंतु बहुसंख्य जीवितहानी दक्षिणेकडील पर्वतीय भागात अल-हौज आणि ताराउडंट प्रांतांमध्ये नोंदवली गेली. अल जझीराने अहवाल दिला.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओ आणि चित्रांमध्ये ढिगाऱ्यांचे डोंगर आणि धूळ ढग दिसत आहेत. कारण कोसळलेल्या भिंतींनी भूकंपाची तीव्रता वाढवली आहे.
दरम्यान, शोध आणि बचाव कार्यासाठी रस्ते मोकळे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा :