Morning Drinks: तुम्हीही ‘मध-लिंबू पाणी’ घेताय? हे तुमच्यासाठी…

Morning Drinks: तुम्हीही ‘मध-लिंबू पाणी’ घेताय? हे तुमच्यासाठी…
Published on
Updated on

मध, पाणी किंवा लिंबू पाणीमध्ये कोल्ड ड्रिंक्स किंवा फ्रूट ज्यूसपेक्षा कमी उष्मांक (Morning Drinks) असतात. अर्धे लिंबू पाण्यात पिळून प्यायले तर त्यातून 9 उष्मांक मिळतात आणि जर 1 सपाट चमचा मध त्यात घातला तर 34 उष्मांक मिळतात.

बरेच लोक वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यावर मध-लिंबू पाणी किंवा लिंबू-पाणी पितात. सकाळी उठल्यावर जर हे प्यायले तर शरीर हायड्रेट होते म्हणजे पाणी मिळते व चयापचय सुधारण्यास मदत होऊ शकते. ह्या पेयातून खूप कमी प्रमाणात फायबर्स, व्हिटॅमिन्स व मिनरल्स मिळतात.

ज्यांना फक्त मध, लिंबू, पाणी प्यायल्यानंतर पोट साफ होते, भूक कमी होते, फ्रेश वाटते, तसेच वजन नियंत्रणात आहे असे वाटते त्यांनी ते सुरू ठेवण्यास हरकत नाही. लिंबातून व्हिटॅमिन 'सी' मिळते; पण ते इतर गोष्टींतूनही मिळते. लिंबाच्या रसामध्ये (Morning Drinks)  सापडणार्‍या आम्लामुळे दातांवरच्या चकचकीत कठीण आवरणावर परिणाम होऊन दात किडू शकतात.

अ‍ॅसिडिटीचा त्रास असेल तर तो आणखी वाढू शकतो. उपाशीपोटी कुठलीही गोष्ट घेतली की शरीरात त्याची प्रतिक्रिया लगेच होते. लिंबू-पाणी उपाशीपोटी पिण्यापेक्षा संध्याकाळी घ्यावे. लिंबू पाण्याऐवजी लिंबाचा रस वेगवेगळ्या पदार्थांवर घेऊ शकता. त्यामुळे लोहाचे शरीरात चांगल्या पद्धतीने शोषण होऊ शकते व लिंबातून 'क' जीवनसत्त्व तर मिळतेच. लिंबाच्या सालामध्येही व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. त्यामुळे तुम्ही लिंबाचे लोणचे खाऊ शकता.

महत्त्वाची बाब इतकीच की, केवळ लिंबू-पाणी किंवा मध-पाणी घेतल्यामुळे चरबी कमी होत नाही. चरबी कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणे व योग्य आहार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्यांचे लिंबू-पाणी घेतल्यामुळे जर वजन कमी झाले असेल तर हे पहावे लागेल की, त्यांनी जीवनशैलीत काही बदल केला आहे का? फक्त लिंबू-पाणी पिऊन वजन कमी झाले असेल तर ती खूप दुर्मीळ केस म्हणावी लागेल. लिंबू-पाणी किंवा मधपाणी घेतल्यामुळे होणारे फायदे व तोटे लक्षात घेणे गरजेचे आहे. कुणीतरी सांगितले म्हणून(Morning Drinks)  घेऊ नका.

काहीही अन्न खाऊन ते मध-लिंबू पाणी पिऊन पचवता येते, या भ्रमातून बाहेर आलात तरच आहार व व्यायाम ह्या गोष्टींकडे लक्ष देऊन वजन कमी व नियंत्रित करता येईल.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news