Morgan Stanley Report on India | पीएम मोदींच्या ९ वर्षांच्या कार्यकाळात भारताचा संपूर्ण कायापालट, ‘मॉर्गन स्टेनली’चा अहवाल! ‘हे’ ४ मोठे बदल ठरले प्रगतीचे कारण

Morgan Stanley Report on India | पीएम मोदींच्या ९ वर्षांच्या कार्यकाळात भारताचा संपूर्ण कायापालट, ‘मॉर्गन स्टेनली’चा अहवाल! ‘हे’ ४ मोठे बदल ठरले प्रगतीचे कारण

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या 9 वर्षांच्या कार्यकाळात (PM Narendra Modi's nine years of governance) भारताचा संपूर्ण कायापालट झालेला आहे. हे कौतुकोद्गार कुणा भाजपच्या नेत्याचे नाहीत, तर अमेरिकेतील दिग्गज गुंतवणूक बँक 'मॉर्गन स्टेनली'च्या एका अहवालात हे नमूद करण्यात आलेले आहे. गत नऊ वर्षांत असे निर्णय भारत सरकारने घेतले, अशी पावले उचलली, अशी वाटचाल केली, अशी धोरणे राबविली की, जगभरातील अर्थतज्ज्ञांचे डोळे दीपायला झाले. (Morgan Stanley Report on India)

मोदी सरकारच्या 9 वर्षांच्या वाटचालीच्या बळावरच भारत जगातील सर्वाधिक बलाढ्य अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट झालाच, त्यासह डिजिटल, आयटी, फार्मसीसारख्या अनेक क्षेत्रांत भारताकडे जगाचे नेतृत्व आले. मोदींनी भारताचा आवाज जगभरात बुलंद केला. जागतिक बाजारामध्ये भारताबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण केली आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून ही उत्सुकता मोठमोठ्या संधींमध्ये रूपांतरित केली, असा गौरव या अहवालातून करण्यात आला आहे. (Morgan Stanley report)

'मॉर्गन स्टेनली'चे निष्कर्ष

1) अमेरिकेतील एक बँक म्हणून आम्ही आर्थिक क्षेत्रातील मोदींचे कर्तृत्व मान्य करतो.
2) 2010 पर्यंतच्या परिस्थितीच्या तुलनेत गेल्या
9 वर्षांत विविध क्षेत्रांत भारताने प्रगतीचे मोठे पल्ले गाठले आहेत.
3) आशिया खंडच नव्हे, तर जगाच्या आर्थिक प्रगतीमध्ये मोठी भूमिका निभावण्यासाठी भारत आता सज्ज आहे.

भारत ठरतोय जगासाठी दीपस्तंभ

युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला जर्मनी मंदीच्या दुष्टचक्रात अडकलेला आहे. अमेरिका कसाबसा दिवाळखोर ठरण्यातून बचावलेला आहे. चीन कोरोनाच्या संकटातून सावरलेला नाही, असेही 'मॉर्गन स्टेनली'ने म्हटले आहे.
भारताची वाटचाल मात्र जगासाठी आशेचा किरण ठरली आहे, असे स्पष्ट करून दररोज भारतात देशासाठी, जगासाठी दीपस्तंभ ठरतील अशा नवनव्या प्रतिष्ठानांचा, कंपन्यांचा, स्टार्टअप्सचा उदय होत आहे, असे निरीक्षणही या अहवालातून नोंदविले आहे.

'हे' 4 मोठे बदल ठरले प्रगतीचे कारण

1) मोदी सरकारने भारतात कॉर्पोरेट करांचे दर जगातील अन्य देशांच्या बरोबरीला आणून ठेवले, असे 'मॉर्गन स्टेनली'ने स्पष्ट केले आहे.
2) मोदींच्या काळात पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढली.
3) वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन सातत्याने व वेगाने वाढत गेले. यामुळे अर्थव्यवस्था मजबूत झाली.
4) जीडीपीच्या टक्केवारीत डिजिटल व्यवहारांचे प्रमाणही वाढले आहे. अर्थव्यवस्था दिवसेंदिवस अधिकाधिक संघटित होत चालल्याचे हे संकेत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news