Israel-Gaza war : गाझामध्ये 30,000 हून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू, हमासच्या आरोग्य मंत्रालयालाची माहिती

File Photo
File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Israel-Gaza war : गाझा पट्टीत पॅलेस्टिनी नागरिकांच्या मृत्यूची संख्या 29,954 वर पोहोचली आहे. हमास संचालित आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत झालेल्या इस्रायली सैन्याच्या हल्ल्यात 76 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले असून 110 जण जखमी झाल्याचे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरला सुरू झालेल्या इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत एकूण जखमींची संख्या 70,325 वर पोहोचली आहे.

इस्रायलच्या सैन्याकडून जोरदार बॉम्बस्फोट केले जात आहेत. यादरम्यान नागरी संरक्षण आणि रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांची कमतरतेमुळे काही मृत व्यक्ती ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत, अशी माहिती शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिली आहे. बुधवारी, इस्रायली प्रसारमाध्यमांनी सांगितले की गाझा पट्टीमध्ये झालेल्या लढाईत दोन आयडीएफ अधिकारी ठार झाले आणि सात सैनिक जखमी झाले. त्यामुळे मरण पावलेल्या सैनिकांची संख्या 582 वर पोहोचली आहे. (Israel-Gaza war)

आयडीएफच्या सूत्रांचा हवाला देत अहवालात म्हटले आहे की, संपूर्ण गाझा पट्टीमध्ये इस्रायलकडून जमीनीवरील युद्ध मोहीम सुरूच आहे. इस्रायली सैन्याने बोगदे आणि हमासच्या इतर पायाभूत सुविधा नष्ट केल्याचे अहवालात म्हटले आहे. इस्रायली संरक्षण दलाचे (आयडीएफ) प्रवक्ते डॅनियल हगारी म्हणाले की, 'इस्रायलवर 7 ऑक्टोबर 2023 सारखा हल्ला पुन्हा कधीही करण्याची धमक शस्त्रूमध्ये असेल. हेच उद्दिष्ट आम्ही सध्या सुरू असलेल्या गाझामधील युद्धाद्वारे सुनिश्चित केले आहे.' (Israel-Gaza war)

7 ऑक्टोबर 2023 रोजी दक्षिण इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात सुमारे 1,200 इस्रायली मारले गेले आणि 200 हून अधिक लोकांना ओलीस बनवले गेले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news