ITI Kolhapur : ‘आयटीआय’चे 1500 हून अधिक प्रशिक्षणार्थी विद्यावेतनाविना !

ITI Kolhapur : ‘आयटीआय’चे 1500 हून अधिक प्रशिक्षणार्थी विद्यावेतनाविना !

कोल्हापूर : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने सुरू केलेल्या शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेंतर्गत शासकीय आयटीआयमधील 1500 हून अधिक उमेदवारांना विद्यावेतन मिळालेले नाही. प्रशिक्षणार्थींना डीबीटीद्वारे विद्यावेतन देण्यासाठी तयार केलेले 'मॅप्स' पोर्टल जुलै 2023 मध्ये दोन वर्षांनंतर सुरू झाले आहे. याच्या माध्यमातून अद्याप कार्यवाही पूर्ण झालेली नाही. (ITI Kolhapur)

उद्योग टिकवणे व त्यांच्या विकास आणि विविध कार्यासाठी प्रशिक्षित कर्मचार्‍यांची आवश्यकता असते. अनेक उद्योगांना कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासते. उद्योगांना कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून शिकाऊ प्रशिक्षण योजना राबवली जाते. 2021 पूर्वी प्रशिक्षणार्थींना ऑफलाईन अर्ज स्वीकारून विद्यावेतन दिले जात होते. त्यात बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला. शासकीय, निमशासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारांची भरती वाढवून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने जून 2001 मध्ये महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना (मॅप्स) सुरू केली. त्यासाठी समिती गठित केली. (ITI Kolhapur)

'मॅप्स' पोर्टल सुरु होण्यास विलंब

मॅप्सच्या माध्यमातून ऑनलाईन स्वीकारुन डीबीटीद्वारे 3 हजार 500 रुपये वेतन देण्याचे ठरले. मात्र, 'मॅप्स' पोर्टल सुरु होण्यास दोन वर्ष लागली. शासकीय आयटीआयने क्लेमसाठी शिकाऊ उमेदवारांचे 3700 अर्ज सादर केले. त्यामधील 2 हजार विद्यार्थांना विद्यावेतन मिळाले आहे. उर्वरित प्रशिक्षणाचे अर्ज त्रुटींची पूर्तता करुन पाठविल्याचे समजते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news