उत्तर प्रदेश: 100 हून अधिक लोकांनी विविध धर्म सोडून पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला

उत्तर प्रदेश: 100 हून अधिक लोकांनी विविध धर्म सोडून पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा येथे 20 कुटुंबातील 100 हून अधिक लोकांनी विविध धर्म सोडून हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. खुर्जा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार मीनाक्षी सिंह यांनी ही माहिती दिली.

राष्ट्रीय चेतना मंच या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष हेमंत सिंह म्हणाले, 'बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या धर्म प्रसार विभागाच्या संयुक्त विद्यमाने सनातन धर्मातील घरवापसी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जे लोक काही वर्षांपूर्वी विविध परिस्थितीमुळे किंवा लोभामुळे सनातन धर्माचा त्याग करून दुस-या धर्मात गेले होते, त्या लोकांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला आहे. या लोकांच्या स्वागतासाठी वैदिक मंत्रोच्चार करण्यात आला. ज्यामध्ये सर्व लोकांनी आनंदाने आपली उपस्थिती दर्शवली. आपली चूक सुधारून सर्वांनी प्रभू श्री राम, श्री कृष्ण आणि सनातन देवतांची पूजा तसेच भारत मातेची सेवा आणि रक्षण करण्याचा संकल्प केला आहे.'

20 कुटुंबांचा घरवापसी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेनुसार सर्वांचे प्रतिज्ञापत्र आणि संमतीपत्र तयार करून आणि औपचारिक प्रक्रिया पूर्ण करून हा वैदिक विधी संपन्न झाल्याचेही हेमंत सिंह यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news