तेलंगणा : १०० हून अधिक गुंडांनी घरात घुसून केले युवतीचे अपहरण; व्हिडिओ व्हायरल

तेलंगणा
तेलंगणा

पुढारी ऑनलाईन : तेलंगणाच्या रंगा रेड्डी जिल्ह्यातील धक्कादायक करणारी घटना समोर आली आहे. येथील आदिभटला परिसरातील १०० हून अधिक व्यक्तींनी घरात घुसून युवतीचे अपहरण केले आहे. एवढेच नाही तर, या घटनेतील आरोपींनी तिच्या घराची आणि गाड्यांचीही तोडफोड केली आहे.

दरम्यान, याला विरोध करताना या आरोपी गुंडांनी पीडितेच्या वडिलास काठ्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती देताना पीडितेच्या कुटुंबियांनी सांगितले की, सुमारे 100 लोक अचानक त्यांच्या घरात घुसले. यानंतर या गुंड प्रवृत्तीचे आरोपी त्यांच्या २४ वर्षीय मुलगी वैशाली हिला जबरदस्तीने घेऊन गेले.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच याप्रकरणी तपास सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांचे सांगितले आहे. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये अनेक तरुण घरात घुसून हल्ला करताना दिसत आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news