मान्सून यंदा 19 मेपूर्वीच अंदमानात, 31 मे रोजी केरळात

Monsoon
Monsoon

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अंदमानात यंदा मान्सूनच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. अनुकूल स्थितीमुळे मान्सूनच्या वार्‍यांचा वेग वाढला आहे. तो 19 मेपूर्वीच अंदमानात, तर 1 जूनच्या आधी केरळात दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

काय आहे मान्सूनचा अंदाज?

  • अंदमानात यंदा मान्सूनच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत.
  • यंदा मान्सून 19 मेपूर्वीच अंदमानात होईल
  • 1 जूनच्या आधी केरळात दाखल होण्याची शक्यता

अंदमानात यंदा सर्वप्रथम 13 मे रोजी रात्री उशिरा मान्सूनच्या हालचाली तयार होण्यास सुरुवात झाली. 14 मे रोजी या हालचालींना वेग आला. वार्‍यांचा वेग आणि योग्य दिशा तसेच हवेचे अनुकूल दाब आणि सध्या अंदमान आणि निकोबार बेटांवर पाच दिवस पडत असलेला पाऊस या स्थितीवरून मान्सूनची सक्रिय वर्दी हवामान विभागाने मंगळवारी अधिकृतपणे दिली. त्यामुळे आता केरळमध्येदेखील मान्सून 31 मेपर्यंत दाखल होण्याची शक्यता अधिक आहे, असा अंदाज वर्तविला जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मान्सूनचे वारे दक्षिण अंदमानातून वेगाने प्रगती करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news