पुढारी ऑनलाईन : सध्या देशातील अनेक राज्यात मान्सून, माघारीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भ, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशाचा काही भाग आणि संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये मान्सून परतीस पोषक वातावरण निर्माण झाले असून, येत्या २४ तासांत मान्सून माघारी जाणार असल्याची दाट शक्यता हवामान विभाने दर्शवली आहे.
गेल्या काही दिवसापासून अनेक राज्यांना दणका देत, अखेर मान्सूनने माघारी जाण्याची तयारी केली आहे. पण मध्य महाराष्ट्र, कोकण-गोव्यात १९ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पण पुढील काही दिवस अजून काही भागात पाऊस पडणार आहे. तसेच या आठवड्यात मुंबई, पुणे, ठाणे, सातारा, नाशिक, औरंगाबाद, बीड आणि सोलापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
गेल्या काही वर्षातील अंदाजानुसार, १० ऑक्टोबर पूर्वीच मान्सून माघार घेतो. पण यावर्षी मात्र मान्सूनने आपला मुक्काम लांबवला आहे. १८ ऑक्टोबरपर्यंत तरी मान्सून परतलेला नाही, पण येत्या दोन दिवसात मान्सून परतणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे.
मान्सून परतीच्या पावसाने देशातीस अनेक राज्यांसह महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, बीड आणि सोलापूर जिल्ह्यांना चांगलेल झोडपले आहे. गेल्या आठवड्यांपासून या भाागत मुसळधार पाऊस पडत आहे.