MonkeyPox : समलैंगिक संबधांतून अधिक फैलाव?

MonkeyPox : समलैंगिक संबधांतून अधिक फैलाव?

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील तसेच युरोपमधील देशांत मंकीफॉक्स (MonkeyPox) हा आजार वेगाने फैलावत आहे. हा आजार शारीरिक संबंधातून फैलावतो का? अशी शंका तज्ज्ञांतून व्यक्त होत आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि ब्रिटनमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी काही बार आणि सॉनाची तपासणीही केली आहे. विशेष करून समलैंगिक पुरुषांतून हा आजार पसरत असल्याची शंका व्यक्त होत असल्याने ही तपासणी करण्यात आली.

ब्रिटनच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार नव्याने मंकीफॉक्स (MonkeyPox) झालेल्यापैंकी ६ रुग्ण हे समलैंगिक पुरुष आहेत, आणि त्यांचे पुरुष पार्टनर सोबत संबंध आले होते.

स्पेनमध्ये ७ आणि पोर्तुगालमध्ये ९ पुरुषांना हा (MonkeyPox) आजार झाला आहे, त्यातील बहुतांश समलैंगिक आहेत. त्यामुळे ब्रिटनमधील आरोग्य अधिकाऱ्यांना समलैंगिक जोडप्यांना अधिक दक्षता घेण्याची सूचना केलेली आहे. आतापर्यंत ९२ लोकांत हा आजार दिसून आला आहे.

हा आजार कसा पसरतो?

श्वसन संस्था, एखादी जखम, डोळे यातून हा आजार शरीरात प्रवेश करतो. मंकीफॉक्स (MonkeyPox) झालेल्या रुग्णाशी शारीरिक संबंधातूनही हा आजार होऊ शकतो.

या आजारात सुरुवातीला ताप, डोकेदुखी, अंगदुखी अशी लक्षण दिसतात त्यानंतर सर्व शरीरभर फोड येतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news