माकडाने पळवली लाख रुपये असलेली बॅग!

माकडाने पळवली लाख रुपये असलेली बॅग!
Published on
Updated on

लखनौ : माकडं कधी, कोणता उपद्व्याप करतील हे काही सांगता येत नाही. हातातील मोबाईल, गॉगल, बॅग किंवा खाद्यपदार्थ पळवून नेणारी माकडं अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. आता अशाच एका माकडाने खाऊच्या आशेने एका व्यक्तीची बॅग पळवली. या बॅगेत खाऊ नसून तब्बल एक लाख रुपये असल्याने त्याचे धाबे दणाणले!

उत्तर प्रदेशच्या रामपूर येथे घडलेल्या या घटनेची सध्या संपूर्ण शहरात जोरदार चर्चा रंगली आहे. मंगळवारी शहाबाद येथे विक्री करारासाठी नोंदणी कार्यालयात एक व्यक्ती आली होती. त्याने स्वत:सोबत 1 लाखांची रोख रक्कम आणली होती. रक्कम असलेली बॅग त्याने गाडीलाच लावून ठेवली होती. माकडाने जेव्हा बॅग चोरली तेव्हा हा सगळा प्रकार कॅमेर्‍यात कैद झाला. यानंतर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. शराफत हुसेन हे दिल्लीत वास्तव्यास आहेत. त्यांनी आपली दुचाकी पार्क केल्यानंतर तिथे असणार्‍या एका बाकड्यावर बसून आपली कागदपत्रे तपासत होते. शराफत हुसेन आपल्या कामात व्यग्र असतानाच माकड तिथे आले. तेथे पार्क करण्यात आलेल्या बँगांमध्ये काही सापडतंय का हे ते पाहत होते.

यावेळी त्याच्या हाती हुसेन यांची बॅग लागली. त्यात 1 लाख रुपये असल्याचे दिसताच ते बॅग घेऊन पळून गेले. दुसरीकडे शराफत हुसेन यांना याची कल्पनाच नव्हती. यानंतर घटनास्थळी एकच गदारोळ सुरू झाला होता. सर्वजण माकडाचा शोध घेऊ लागले होते. यावेळी माकड एका झाडावर बसले असल्याचे त्यांना दिसले. उपस्थित लोकांनी माकडाकडून आपली बॅग मिळवण्याचा प्रयत्न केला; पण बॅग हाती लागत नव्हती. माकडाचा पाठलाग केला असता अखेर हुसेन यांना बॅग मिळवण्यात यश आले. सुदैवाने त्यांचे सर्व पैसे सुरक्षित होते!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news