Momos : चवदार मोमोजचा रंजक प्रवास

Momos
Momos
Published on
Updated on

नवी दिल्ली : खवय्यांच्या लाळग्रंथी मोकाट सोडणारा सध्याचा आवडता खाद्यप्रकार म्हणजे (Momos) मोमोज. भाज्या आणि चिकनने भरलेला हा पदार्थ लोकांच्या जिभेवर निरंकुश सत्ता गाजवत आहे. आजकाल या वाफवलेल्या पदार्थाचे अनेक नवनवे प्रकार उपलब्ध होऊ लागले आहेत. यात फ्राय मोमोज, चीज मोमोज हे विशेष लोकप्रिय आहेत. मसालेदार चटणीच्या अप्रतिम चवीचा विचार करूनच तोंडाला पाणी सुटते. पण, मोमोज नावाचा हा पदार्थ भारतात इतका लोकप्रिय कसा झाला हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर वाचा ही माहिती. मोमोज कुठून आले?

तसे बघायला गेले तर मोमोजचा (Momos) इतिहास जुना आहे. अनेक देशांतून फिरून हा पदार्थ भारतात दाखल झाला आहे. इतिहासावर नजर टाकली तर 14 व्या शतकाच्या आसपास मोमोज बनविण्यात आले होते, असे दिसून येते. तिबेट आणि नेपाळ हे दोन्ही देश मोमोजचे मूळ ठिकाण मानले जाते. दोन्ही देश तसा दावाही करतात. भारतात आल्यावर इथल्या चवीनुसार मोमोजमध्ये बदल करण्यात आले.

असे मानले जाते की, 1960 च्या दशकात मोठ्या संख्येने तिबेटी भारतात आले आणि लडाख, दार्जिलिंग, धर्मशाळा, सिक्कीम आणि दिल्लीसारख्या भागात स्थायिक झाले. त्यांनी आपल्या पद्धतीने या पदार्थात रंग भरले. त्यानंतर मोमोजची (Momos) सर्वाधिक विविधता बदलत गेली. तिबेटनध्ये प्रसिद्ध असलेले मोमो भारतात कसे आले याची गोष्टही रंजक आहे. असे म्हटले जाते की, काठमांडूचा एक दुकानदार भारतात आला आणि व्यापारामुळे तिबेटी रेसिपीही त्याच्याबरोबर भारतात पोहोचली. त्यानंतर भारतात हा पदार्थ प्रचलित होत गेला.

मोमोजचे (Momos) विविध प्रकार

सुरुवातीला मोमोज (Momos) मांस भरून बनवले गेले. विशेषतः याक या प्राण्याचे मांस त्यात वापरले जायचे. तथापि, तिबेटच्या डोंगरावरून उतरून हा पदार्थ उत्तर भारताकडे आल्यावर चवीनुसार भाजी भरूनही तयार करण्यात आला. कोणतीही पाककृती असो, भारतात तिची चव बदलत गेली. असेच काहीसे मोमोजच्या बाबतीत घडले. भारतातील रस्त्यांपासून ते पंचतारांकित हॉटेल्सपर्यंत, मसालेदार चिकन, मांस, पनीर, भाज्या, चीज आणि सीफूडसह अनेक प्रकारचे मोमोज पाहायला मिळतात.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news