मोहम्मद शमीच्या भावाचीही चमक

मोहम्मद शमीच्या भावाचीही चमक

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : रणजी करंडक स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीतील पहिल्या दिवशी बंगालच्या संघाने मोहम्मद कैफच्या उल्लेखनीय गोलंदाजीच्या जोरावर उत्तर प्रदेश संघावर कुरघोडी केली. भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर असला तरी त्याचा भाऊ मोहम्मद कैफ रणजी करंडक स्पर्धेत आपला दम दाखवतोय.

रणजी करंडक स्पर्धेत दुसराच सामना खेळणार्‍या मोहम्मद कैफने बंगालकडून खेळताना 14 धावांत 4 विकेटस् घेतल्या आणि उत्तर प्रदेशचा संपूर्ण संघ 60 धावांत तंबूत पाठवला. पण, उत्तर प्रदेशच्या भुवनेश्वर कुमारनेही गोलंदाजीत कमाल दाखवली, त्यानेही 25 धावांत 5 विकेटस् घेत बंगालला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. मोहम्मद कैफच्या गोलंदाजीमुळे उत्तर प्रदेशचा पहिला डाव 20.5 षटकांत संपुष्टात आला.

पं. बंगाल संघाला या सामन्यात मोठी आघाडी घेण्याची संधी होती, परंतु 2018 नंतर रणजी करंडक स्पर्धा खेळणार्‍या भुवनेश्वर कुमारने उत्तर प्रदेश संघाला दिलासा दिला. त्याने 25 धावांत 5 विकेटस् घेत बंगालची अवस्था 5 बाद 95 अशी केली. त्यांना 35 धावांची आघाडी मिळाली असून बंगालचा श्रेयांश घोष 27 धावांवर खेळतोय. अंधुक प्रकाशामुळे सामना लवकर थांबवण्यात आला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news