मुंबई; पुढारी ऑनलाईन : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मंगळवारी (दि. १७) पासून दोन दिवस पुणे दौरा करणार आहेत. यामुळे आज सकाळीच मुंबईहून ते पुणे दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. पुणे दौऱ्यानंतर पुढे ते औरंगाबादला रवाना होणार आहे. याच दरम्यान राज ठाकरे यांच्या ठिकठिकाणी जंगी स्वागताची तयारी केली आहे. पुणे दौऱ्यावेळी नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांशी बैठक घेण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
अयोध्या दौऱ्याला जाण्यापूर्वी पदाधिकाऱ्यासोबत संवाद साधण्यासाठी आणि अयोध्या दौऱ्यात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्याच्या नाव नोंदणी मोहिमेच्या उदघाटन संभारंभासाठी राज ठाकरे पुण्यात येणार आहेत. त्याच्या आगमनासाठी मनसे कार्यकर्त्यांनी पुण्यात जय्यत तयारी केली आहे. पुणे दौरा पुर्ण झाल्यानंतर ते औरंगाबाद दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत.
याच दरम्यान काही दिवसांपासून मनसे नेते वसंत मोरेंचे नाराजी व्यक्त केली होती. ती नाराजी दूर होणार का? अशा चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत. या पुणे दौऱ्यात वसंत मोरे राज ठाकरेची पुन्हा भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. भोंग्याच्या विरोधातील भूमिका घेतल्यानंतर मनसे नेते वंसत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आले होते. यानंतर त्याच्या जागी नवे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांची नियुक्ती झाली होती. यानंतर मोरेंनी शिवतीर्थवर जावून राज ठाकरेंची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी तुमला निवांत वेळ देवू असे सांगितले होते. आता पुणे दौऱ्यावर राज ठाकरे येत आहेत.
हेही वाचलंत का?