आमदार यशवंत माने यांच्यावर तालिका अध्यक्षांची महत्वपूर्ण जबाबदारी

आमदार यशवंत माने यांच्यावर तालिका अध्यक्षांची महत्वपूर्ण जबाबदारी
Published on
Updated on

शेळगाव (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : शेळगाव(ता इंदापूर)चे सुपुत्र व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू मोहोळ विधानसभेचे आमदार यशवंत विठ्ठल माने यांची विधानसभेचे तालिका अध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा सोमवारी(दि. १७) विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली आहे. मुंबई येथे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारी सुरू झाले असून यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार यशवंत माने यांना पवार यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली आहे.

आमदार यशवंत माने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक व विश्वासू म्हणून राज्यात ओळख आहे. यापूर्वी माने यांनी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापतीपद भुषविले आहे व सध्या संचालकपद भूषवत आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय आमदार यशवंत माने यांनी घेतला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news