MLA Prakash Awade : नतद्रष्ट राज्य सरकारमुळे वस्त्रोद्योग अडचणीत : प्रकाश आवाडे

MLA Prakash Awade : नतद्रष्ट राज्य सरकारमुळे वस्त्रोद्योग अडचणीत : प्रकाश आवाडे
Published on
Updated on

इचलकरंजी ; पुढारी वृत्तसेवा : वस्त्रोद्योगापैकी 50 टक्के पेक्षा जास्त उत्पादन महाराष्ट्रात होते. मात्र राज्य सरकारच्या नतद्रष्ट धोरणामुळे वस्त्रोद्योग अडचणीत येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑनलाईन फॉर्म न भरणार्‍या यंत्रमागधारकांची वीज दरातील सवलत बंद करण्याचा निर्णय वस्त्रोद्योगाला न परवडणारा असल्याचे मत आ. प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केले. (MLA Prakash Awade)

वीज दर सबसिडीची मंगळवारी मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीस निमंत्रण नसले तरी उपस्थित राहणारच आणि शहराची भूमिका स्पष्ट करणार, असे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. सध्याच्या राज्य शासनाला उद्योग, व्यवसाय, धंद्याशी काहीही घेणं-देणं नसल्याचे सांगत हे सरकार निबार असल्याची टीकाही त्यांनी केली.

MLA Prakash Awade : उद्योजकांना जवळपास दुप्पट दराने वीज बिल

वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या संकेतस्थळावर माहिती न भरणार्‍या 27 अश्वशक्तीवरील उद्योजकांची वीज सवलत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योजकांना जवळपास दुप्पट दराने वीज बिल आले आहे. या पार्श्वभूमीवर पॉवरलूम असोसिएशनमध्ये शहरातील यंत्रमागधारक संघटनांची बैठक झाली. त्यानंतर प्रकाश आवाडे यांनी पत्रकार बैठकीत राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली.

शासनाकडून पूर्वी 27 अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांना वीज सवलत मिळत होती. त्यामध्ये 75 पैसे अतिरिक्त सवलत मिळावी ही मागणी सातत्याने करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षीच्या अधिवेशनात उपस्थित करून लवकरच सवलत जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र आजपर्यंत त्याची पूर्तता झाली नाही. एकीकडे सवलत मिळण्यासाठी संघर्ष सुरू असताना जवळपास दुप्पट दराने वीज आकरणी करून ती उद्योजकांच्या माथी मारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

अंतर्गत राजकारण आणि त्यातून होणारी कुरघोडी यामुळे दोन वेळा आमदारकीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवून विजय संपादन केला. विजयानंतर भाजपला पाठिंबा दिला. त्यातूनच राजकीय धुसफूस सुरू झाल्याचा आरोप आवाडे यांनी केला.

यावेळी सतीश कोष्टी, विनय महाजन, राजगोंडा पाटील, गोरखनाथ सावंत, दत्तात्रय कनोजे, चंद्रकांत पाटील, प्रकाश गौड, सुभाष बलवान, सूरज दुबे, सचिन कांबळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

…म्हणून 'अण्णा को गुस्सा आता है'

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात केवळ श्रेयवादाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप आ. आवाडे यांनी केला. कोणत्याही प्रश्नांवर निर्णय होत नसल्यानेच 'अण्णा को गुस्सा आता है', असा टोलाही त्यांनी मारला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news