पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळ्या अभिनेत्रीने बोल्ड बिकिनीत फोटो तर शेअर केले आहेतच. (Mitali Mayekar ) शिवाय, मला 'आपली संस्कृती'वर देण्याचा प्रयत्न करू नका, असा खणखणीत सल्ला तिने उघगपणे दिला आहे. अभिनेत्री मिताली मयेकर हिने कलरफुल बिकिनीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शन लिहिलीय की, मी जागी झालीय आणि वादाचा दिवस निवडलाय.?? मला 'आपली संस्कृती' ज्ञान देण्याचा प्रयत्न कमेंट सेक्शनमध्ये करू नका. तुम्हाला स्वत: ला लाज वाटेल. ✌? (Mitali Mayekar )
या फोटोंवर अनेक मराठी कलाकारांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. अभिजित खांडकेकरने Ayeeee ? अशी कमेंट दिलीय. प्रार्थना बेहरेने ??? स्माईली इमोजी शेअर केली आहे. शिवानी बावकरने Killing it and how! ?? असे म्हटले आहे तर जुईली जोगळेकरने ?? फायर इमोजी शेअर केले आहेत.
तर काही नेटकऱ्यांनी तिला प्रतिप्रश्न विचारत ट्रोल केले आहे. एकाने म्हटलंय- काही नाही घातलं तरी आमचं काय जाणार आहे? That's ur choice…बाकी महाराष्ट्रीय संस्कृतीच आणि तुझं काही देणंघेणं नाही हे तर पोस्टवरून सिद्ध झालंच…?
अनेक युजर्सनी हार्ट इमोजी शेअर करत तिचे कौतुक केले आहे.
दरम्यान, प्रार्थना बेहरेने मोनोकिनी परिधान केल्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. त्यावेळी तिला अनेकांना खडेबोल सुनावले होते. आता मितालीने बिकिनी फोटो शेअर केले आहेत. पण, सोबतच तिने आधीच स्पष्ट करून टाकले आहे की, लोकांनी तिला कोणतेही ज्ञान देऊ नये.