मिरज : रेल्वे उडवून देण्याची धमकी : पोलिस सतर्क

मिरज : रेल्वे उडवून देण्याची धमकी : पोलिस सतर्क

मिरज, पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण रेल्वे उडवून देण्याचा रेल्वे सुरक्षा दलाला फोन आल्याने राज्यातील सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. रेल्वे सुरक्षा दलाने मिरज रेल्वे स्थानकातून धावणार्‍या सर्व रेल्वे गाड्यांची व स्थानकातील प्रवाशांच्या साहित्याची तपासणी केली.

कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात अज्ञाताने फोन करून प्रवाशांनी संपूर्ण भरलेली रेल्वे उडवून देण्याची धमकी दिली होती. त्यानुसार राज्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मिरज रेल्वे स्थानकातून धावणार्‍या प्रत्येक रेल्वेची श्वान पथकामार्फत कसून तपासणी करण्यात आली. तसेच रेल्वे स्थानकात आलेल्या सर्व प्रवाशांच्या साहित्याची देखील कसून तपासणी करण्यात येत होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news