Monkeypox disease | आजारी व्यक्ती, जंगली प्राण्यांशी संपर्क टाळा, मंकीपॉक्स रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी

Monkeypox disease | आजारी व्यक्ती, जंगली प्राण्यांशी संपर्क टाळा, मंकीपॉक्स रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : केरळमध्ये मंकीपॉक्सचा (Monkeypox disease) पहिला रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मंकीपॉक्सचा संसर्ग रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी त्वचेवरील जखमा तसेच आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळावा. मृत किंवा जिवंत जंगली प्राणी (उदा. उंदीर, खारुताई) आणि इतरांशीही संपर्क टाळावा, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

आफ्रिकेतील वन्य प्राण्यांपासून बनवलेली उत्पादने, जसे की क्रीम, लोशन आणि पावडर वापरू नयेत. आजारी लोकांनी वापरलेली दूषित कपडे, बिछाना, आरोग्य सेवेसाठी वापरण्यात आलेल्या वस्तू तसेच संक्रमित प्राण्यांच्या संपर्कात आलेल्या वस्तू वापरणे टाळा, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

जर ताप आणि पुरळ अशी मंकीपॉक्सची लक्षणे दिसून आल्यास जवळच्या आरोग्य सेवेशी सल्लामसलत करा. विशेषत: ज्या भागात मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले आहेत. तेथील लोकांनी विशेष काळजी घ्यावी.

भारतामध्ये पहिला मंकीपॉक्स संक्रमित रूग्ण आढळून आला आहे. हा संक्रमित रूग्ण केरळ या राज्यातील असून, चार दिवसांपूर्वी तो यूएईतून भारतात आला असल्याची माहिती समोर आली आहे. आत्तापर्यंत या रूग्णाच्या संपर्कात ११ जण आले असून, त्या सर्वांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. केरळमधील आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जगातील काही देशांत 'मंकीपॉक्स' (Monkeypox disease) या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण सापडत आहेत. हा विषाणू प्रामुख्याने मध्य आफ्रिका आणि पश्‍चिम आफ्रिकेच्या उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये आढळतो. परंतु, आता सापडलेल्या रुग्णांनी कोणत्याही कारणाने आफ्रिकन देशांमध्ये प्रवास केला नव्हता. याचाच अर्थ, काही ठिकाणी याचा सामूहिक संसर्ग झालेला असण्याची शक्यता दिसून येत आहे.

गे सेक्समुळे मंकीपॉक्सचा अधिक फैलाव

गे सेक्समुळे मंकीपॉक्स पसरत असल्याशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्‍त केली आहे. युरोपमध्ये असा एक मोठा इव्हेंट झाला होता. त्यातून समलैंगिक पुरुषांमध्ये मंकीपॉक्सचे संक्रमण वेगाने पसरल्याचा दावा करण्यात आला होता.

मंकीपॉक्स म्हणजे काय?

मंकीपॉक्स अतिशय दुर्मीळ आजार आहे. देवीचा रोग ज्या विषाणूमुळे होतो, त्याच विषाणूचा हा एकप्रकारे उपप्रकार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. संसर्ग झालेल्या रुग्णाशी जवळचा संबंध आल्यास हा रोग वेगाने पसरतो. या विषाणूचा त्वचा, श्वासनलिका, डोळे, नाक किंवा श्वसनावाटे संसर्ग होऊ शकतो.

त्यावर उपचार काय…

लक्षणांच्या तीव्रतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी, ती कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार देण्यात यावा. दुय्यम बॅक्टरील संसर्ग असल्यास त्यावर योग्य ते उपचार करण्यात यावेत. पुरेशा प्रमाणात द्रव्ये द्यावीत, जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता येणार नाही. पोषक आहार देण्यात यावा.

मंकीपॉक्सची लक्षणे काय?

मंकीपॉक्सची लागण झाल्यानंतर शरीरावर पुरळ येतात. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, सूज, पाठदुखी, स्नायूंमध्ये वेदना, अस्वस्थपणा यांचा समावेश होतो. रुग्ण बरा झाल्यानंतरही शरीरावर डाग तसेच राहतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news