Ministry Of Commerce Internship 2023 : ‘वाणिज्य आणि उद्योग मंत्रालया’सोबत काम करण्याची विद्यार्थ्यांना संधी; मिळणार ‘इतके’ स्टायपेंड

Ministry Of Commerce Internship 2023 : ‘वाणिज्य आणि उद्योग मंत्रालया’सोबत काम करण्याची विद्यार्थ्यांना संधी; मिळणार ‘इतके’ स्टायपेंड

पुढारी ऑनलाईन : वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तुम्हाला वाणिज्य मंत्रालयासोबत काम करायचे असेल आणि भारत सरकारच्या कामाची पद्धत जवळून समजून घ्यायची असेल, तर तुम्ही या इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकता. या इंटर्नशिपचे आयोजन वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार (DPIIT) प्रमोशन विभागाद्वारे केले जाते. अंडरग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि स्कॉलर विद्यार्थ्यांना या इंटर्नशिप प्रोग्रामसाठी अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय किंवा परदेशी विद्यापीठात प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे. ही योजना वर्षभर सुरू असते, ज्यासाठी फक्त ऑनलाइन अर्ज करता येतो.

Ministry Of Commerce Internship 2023: 'इंटर्नशिप' चा कालावधी किती?

ही इंटर्नशिप योजना एक महिना, दोन महिने किंवा जास्तीत जास्त तीन महिन्यांची आहे. विद्यार्थी त्यांच्या इच्छेनुसार निवड करू शकतात. यासाठी एकावेळी एकूण 20 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. इंटर्नशिप व्यवस्थितरित्या पूर्ण केल्यानंतरच अनुभव प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. मात्र, इंटर्नशिपमधून मध्येच बाहेर पडलेल्या किंवा गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्र दिले जाणार नसल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

या क्षेत्रातील उमेदवार अर्ज करू शकतात

या इंटर्नशिप योजनेसाठी अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र, वित्त, संगणक आणि ग्रंथालय व्यवस्थापन क्षेत्रातील उमेदवार UG, PG किंवा संशोधन विद्यार्थी अर्ज करू शकतात. काही प्रकरणांमध्ये, इतर डोमेनमधील उमेदवारांना देखील संधी दिली जाते.

इंटर्नशिप कालावधीत मिळतो इतका 'स्टायपेंड'

निवडलेल्या उमेदवारांना इंटर्नशिप दरम्यान दरमहा 10,000 रुपये इतका स्टायपेंड दिला जातो. त्यासाठी वर्षभरात कधीही अर्ज करता येतो. अर्ज फक्त ऑनलाइन असतील, ज्यासाठी उमेदवारांना https://dpiit.gov.in/internship/internship-scheme.php या लिंकला भेट देऊन अर्ज करता येऊ शकतो.

Ministry Of Commerce Internship 2023: या कागदपत्रांची आवश्यकता

  • अर्ज करताना उमेदवारांना आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे आहे.
  • आधार कार्ड
  • ओळख पुरावा
  • पत्त्याचा पुरावा
  • वयाचा पुरावा/जन्म तारखेचा पुरावा (दहावी/बारावीची मार्कशीट)
  • सध्याच्या शैक्षणिक पात्रतेचा पुरावा
  • बँक तपशील (जेणेकरून स्टायपेंड भरता येईल)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news