मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही : मंत्री सतीश जारकीहोळी

मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही : मंत्री सतीश जारकीहोळी
Published on
Updated on

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  राज्यात काँग्रेसचे सरकार आले नसते तर मी लोकसभा निवडणूक लढविली असती. पण, आता सत्तेत असून मंत्रीपदावर कार्यरत आहे. त्यामुळे, मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. यावेळी तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते.

मंत्री जारकीहोळी यांनी 2021 मध्ये लोकसभा पोटनिवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांचा थोडक्यात पराभव झाला होता. त्यामुळे, 2024 मधील लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसचे उमेदवार असतील असे सांगण्यात येत होते. मंत्री जारकीहोळी यांनीही आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे विधानसभा निवडणुकीपूर्वी सांगितले होते; पण आता त्यांनी राज्यातच काम करणार असल्याचे जाहीर करून संभ्रम दूर केला आहे.

ते म्हणाले, मी आधी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होतो. पण सध्या कर्नाटकात आमचे सरकार आहे. सरकारमध्ये जबाबदार मंत्री आहे, त्यामुळे, मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. स्थानिक आमदारांशी चर्चा करून तरुण उमेदवाराला संधी देण्यात येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news