जर्मनीचे मंत्री डॉ. फ्लॉरेन स्टॅगमन येणार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

जर्मनीचे मंत्री डॉ. फ्लॉरेन स्टॅगमन येणार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : जर्मनीचे मंत्री डॉ. फ्लॉरेन स्टॅगमन लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्यासमवेत वूटनबर्गचे खासदार, महापौर यांच्यासह ३० जणांचे शिष्टमंडळ असणार आहे.

या भेटीमध्ये जर्मनीकडून महाराष्ट्राला ग्रीन हायड्रोजन, अक्षय उर्जा, स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी सहकार्य करण्याबाबत चर्चा होणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नुकताच जर्मनीचा दौरा केला. त्यावेळी जर्मनीने महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे स्टेगमन यांच्या दौऱ्याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. उद्योग, व्यापार क्षेत्रात महाराष्ट्र व जर्मनीचे अनेक वर्षांपासून मैत्रिपूर्ण संबंध आहेत. या दौऱ्याने ते अधिक दृढ होतील.

logo
Pudhari News
pudhari.news