मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्तासंघर्षावरील बहुप्रतिक्षित निकाल गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने जाहीर केला. या निकालावर नेटकऱ्यांनी आपापली प्रतिभा आणि कल्पनाशक्ती वापरत केलेल्या विनोदी, तिरकस विश्लेषणांच्या मेसेजचा पाऊसच सोशल मीडियावर पडू लागला. व्हाटस् अॅपच्या विविध ग्रपवरही निकालावरील मीम्स्, विनोदी मेसेज मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड केले गेले. एकूणच निकालापेक्षा त्याच्या रंजक प्रतिक्रीयाच लक्षवेधी ठरल्या. सर्वोच्च न्यायालयातील निकाल वाचनानंतर अवघ्या काही मिनिटांत निकालावरील विनोदी मेसेज फॉरवर्ड होऊ लागले.