एमआयडीसीचे कार्यालय दुबईत सुरू होणार ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

Uday Samant
Uday Samant
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योजकांशी चर्चा, सल्लामसलत करता यावी, त्याचबरोबर या उद्योजकांनी राज्यात त्यांच्या कंपन्यांचा विस्तार करता यावा यासाठी राज्य शासन जानेवारी, फेब्रुवारीदरम्यान दुबईत एमआयडीसीचे कार्यालय सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी माहिती राज्याच्या उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार राज्यात येणा-या उद्योगांबाबत सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली.

सांमत म्हणाले, पुणे जिल्ह्यात इलेक्ट्रिक कंपन्यांचे जाळे उभारण्यात येणार आहे. राज्यात एकूण 39 हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांना मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर कॅबिनेट उपसमितीमध्ये या गुंतव़णुकीस मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे देशात उद्योगाच्या क्षेत्रात पुन्हा एक नंबरवर आले आहे आणि पुढेही कायम राहील, असेही त्यांनी सांगितले.पुणे आणि परिसरात असलेल्या उद्योगांना स्वतंत्रपणे वीजपुरवठा करण्याबाबत एक्स्प्रेस फिडर वाढविण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार कार्यवाही होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

एमआयडीसी परिसरातील दादागिरी मोडून काढणार
पुण्यासह राज्यातील विविध एमआयडीसीच्या परिसरात स्थानिक लोक उद्योजकांना दादागिरीची भाषा वापरीत आहेत. ही दादागिरी मोडून काढण्यात येणार आहे, असे सामंत यांनी सांगितले. केंद्र सरकारतर्फे रायगड येथे 'लेदर क्लस्टर' उभारण्यात येणार आहे. त्याच्या पायाभूत सुविधांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून 385 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामध्ये किमान सात हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून किमान पंचवीस हजार रोजगार निर्माण होतील, असेही त्यांनी सांगितले.

सहा ठिकाणी स्कील सेंटर
युवकांना विविध कंपन्यांमध्ये चांगला रोजगार मिळावा, त्यांच्या कलाकौशल्यात वाढ व्हावी, यासाठी पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक आणि नागपूर या शहरांत स्कील सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. त्याच्या निविदा लवकरच काढल्या जातील.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news