मुंबई : पुढारी वृत्तसेवा : दरवर्षी तब्बल पाच लाखांहून अधिक विद्यार्थी नोंदणी होणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षा १६ ते ३ एप्रिलदरम्यान होणार आहे. या परी- क्षेसाठी सीईटी संकेतस्थळावर १६ जा- नेवारीपासून अर्ज भरता येणार आहे. ही नोंदणी १ मार्चपर्यंत करता येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ वर्षाकरीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सर्व सामाईक परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षांमध्ये एमएचटी सीईटीला मोठ्या संख्येने विद्यार्थी नोंदणी करतात. परीक्षा १६ ते ३० एप्रिलमध्ये होणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत २२ दिवस अगोदर परीक्षेचे नियोजन केले आहे. (MHT CET)
गतवर्षी ९ ते २० मे या कालावधीत २४ सत्रांत परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला ३ लाख ५४ हजार ५७३ मुलांनी, लांनी, तर २ लाख ८१ हजार ५१५ मुलींनी नोंदणी केली होती, अशी ६ लाख ३६ हजार ०८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.बारावी परीक्षा संपल्यानंतर सीईटी वेळेत व्हावी आणि त्यानंतर प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी यासाठी सीईटी सेलच्या वतीने वेळापत्रक अगोदरच जाहीर केले आहे. पीसीबी आणि पीसीएम ग्रुप नोंदणी १६ जानेव- ारीपासूनच होणार आहे मात्र परीक्षा दोन टप्प्यांत वेगवेगळ्या तारखांना होणार आहे. पीसीबी ग्रुपची परीक्षा १६ ते २३ एप्रिलदरम्यान होणार आहे, तर पीसीएम ग्रुपची परीक्षा २५ ते ३० एप्रिल या कालावधीत होणार आहे.
या परीक्षेच्या पर्सेन्टाईल गुणांच्या आधारेच अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र, कृषी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जाणार आहेत.