‘शासन आपल्या दारी, पैसे उधळतंय वाऱ्यावरी’ : राष्ट्रवादीच्‍या शरद पवार गटाची पोस्ट चर्चेत

‘शासन आपल्या दारी, पैसे उधळतंय वाऱ्यावरी’ : राष्ट्रवादीच्‍या शरद पवार गटाची पोस्ट चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसीय मंत्रिमंडळ बैठक औरंगाबादमध्ये पार पडत आहे; परंतु ही बैठक 'सर्वसामान्यांसाठी' नसून स्वतःच्या मौजेसाठी आणि प्रसिध्दीसाठीच असल्याचे म्हणावे लागेल. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर "शासन आपल्या दारी, पैसे उधळतंय वाऱ्यावरी, मोर्चेकरी दारावरी, सरकार झाडतंय बंदोबस्ताच्या फैरी, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने युती सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्‍या शरद पवार गटाची  'X' पोस्ट सध्या चर्चेत आहे. (MH Government Vs NCP)

राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "महाराष्ट्राच्या कष्टकरी जनतेच्या घामातून उभे राहिलेले कररूपी पैसे खर्च करून, राज्य सरकारने औरंगाबादमध्ये मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन केले. या बैठकीतील घोषणा या आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनमत आपल्या बाजूने वळवण्यासाठीच असल्याचे महाराष्ट्राला कळले आहे." (MH Government Vs NCP)

MH Government Vs NCP: सर्वसामान्यांच्या आशा धुळीस मिळाल्या…

राज्‍य सरकार सर्वसामान्यांसाठी आहे, असे म्हणत महायुतीचे सरकार असंवैधानिकरित्या सत्तेत आले. हे ट्रिपल इंजिन सरकार सर्वसामान्यांसाठी अधिक वेगाने काम करेल असे म्हणू लागले. परंतु हे ट्रिपल इंजिन सर्वसामान्यांच्या दारी न जाता स्वतःचाच राजकीय स्वार्थ साधण्यासाठी दिल्लीच्या दिशेने धावू लागलं अन् सर्वसामान्यांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत, असा आराेपही या पाेस्‍टच्‍या माध्‍यमातून केला आहे.

महायुती सरकारने विकासकामांऐवजी सत्ताकारणालाच प्राधान्य दिले

राज्यातील शेतकरी, कष्टकरी, संघटीत कामगार, महिला व युवकांच्या स्वप्नांवर महायुती सरकारने कुऱ्हाड चालवण्याचे काम केले आहे. धार्मिक व जातीयवादाच्या विळख्यात अडकलेल्या महायुती सरकारने विकासकामांऐवजी सत्ताकारणालाच प्राधान्य दिलंय. पण महाराष्ट्रातील जनता आपल्या अन्यायाविरोधात आज आवाज उठवू लागली आहे. दंडुकेशाहीच्या आधारावर पोलिसांचं भय दाखवण्याचं काम राज्य सरकार करत असल्याचे मराठवाडा मंत्रिमंडळ बैठकीवरून स्पष्ट झालं आहे, असेही राष्ट्रवादीने काँग्रेसच्‍या शरद पवार गटाने म्हटले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news