Mexico : मेक्सिको पुन्हा हादरले! बारमध्ये गोळीबार, ९ ठार, २ जखमी

Mexico : मेक्सिको पुन्हा हादरले! बारमध्ये गोळीबार, ९ ठार, २ जखमी

पुढील ऑनलाईन डेस्क : मध्य मेक्सिको राज्यातील गुआनाजुआटो शहरातील एका बारमध्ये गोळीबार झाला. यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला असून २ जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर येथील स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेक्सिकोच्या गुआनाजुआटो शहरात गेल्या काही दिवसांपासून कार्टेल हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. येथील ड्रग्ज माफियांमधील परस्पर वादाच्या घटनांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

या हिंसाचाराविषयी माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की बुधवारी रात्री ९ च्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) एक सशस्त्र गट गुआनाजुआटो शहरातील एका बारमध्ये आला. बारमध्ये प्रवेश करताच या गटाने लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेनंतर लोक सैरभैर होत धावू लागले. या झालेल्या गोळीबारात ५ पुरुष आणि चार महिलांचा मृत्यू झाला आणि आणखी दोन महिला जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

या घटनेतील हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही. राज्य आणि फेडरल प्राधिकरणांच्या युनिट्स आणि नॅशनल गार्ड या भागात तैनात केले आहेत. हल्लेखोरांनी घटनास्थळी गुन्हेगारी गटाचे संकेत देणारी दोन पोस्टर सोडली गेली आहेत. हल्लेखोर हल्ल्यानंतर काही ना काही संदेश देत असतात.

गेल्या महिन्यात मेक्सिकोच्या इरापुआटो शहरातील एका बारमध्ये अशाच प्रकारचा हल्ला करण्यात आला होता. यामध्ये १२ जण ठार झाले होते, सप्टेंबरमध्ये देखील झालेल्या गोळीबारात १० जणांचा मृत्यू झाला होता. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एंद्रेस मॅन्यूएल लोपेज ओब्राडोर यांनी २०१८ मध्ये कार्टेल हिंसाचार कमी करण्याचे आश्वासन देत पदभार स्वीकारला. २०२२ मध्ये मेक्सिकोत हत्यासत्र कमी झाले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news