पुढारी ऑनलाईन डेस्क : ट्विटरनंतर मेटा या कंपनीने देखील आपल्या ११००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. मेटा ही मार्क झुकरबर्ग यांच्या नेतृत्वाखालील टेक्नॉलॉजी क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. याच मोठ्या कंपनीच्या येवढ्या मोठ्या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे सावट पसरले आहे. भारतातील एका तरुणाचा एक अत्यंत वाईट अनुभव सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आहे. ज्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला त्यापैकी हा एक भारतीय तरुण होता. या तरुणाला मेटामध्ये (META) रुजू झाल्याच्या अवघ्या दोन दिवसानंतर नोकरीवरून काढून टाकण्यात आले. हिमांशू व्ही. असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. (Meta Job Fired)
नोकरीवरून काढून टाकण्याच्या संपूर्ण प्रक्रियेतील हिंमाशू याने त्याचे सर्व वाईट अनुभव सांगितले आहेत. तो मेटा कंपनीमध्ये नोकरीसाठी भारतातून कॅनडामध्ये स्थलांतरित झाला होता. लिंक्डइन या सोशल मीडियावरील त्याच्या प्रोफाइलनुसार, हिमांशू याने IIT-खरगपूरमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याने यापूर्वी GitHub, Adobe आणि Flipkart सारख्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. (Meta Job Fired)
हिमांशू याने त्याच्या लिंक्डइन मधील पोस्टमध्ये भावनिक होत लिहिले आहे की, "मी #Meta कंपनीमध्ये नोकरीकरिता रुजू होण्यासाठी कॅनडामध्ये स्थलांतरित झालो होतो. रुजू झाल्यानंतर अवघ्या २ दिवसातच माझा प्रवास संपला. मला याचा मोठा फटका बसला आहे. मी सध्या कठीण परिस्थितीचा सामना करत असल्याचेदेखील त्याने यावेळी सांगितले आहे." मेटा मधील एका माजी कर्मचाऱ्याने भावनिक होत सांगितले की, या तरुणा सोबत अत्यंत वाईट गोष्ट घडली आहे. आता हा तरुण कोणते पाऊल उचलेल हे काहीच सांगता येत नाही. पण, लिंक्डइन युजर्संनी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची कोणत्याही पोस्टची कोठे व्हेकेन्सी असेल तर या तरुणास सांगून याची मदत करावी.
या सर्व परिस्थितीवरुन हिमांशूचा संघर्ष समोर आला आहे. नोकरीसाठी रुजू झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत जर काढून टाकल्याचे आदेश मिळाले तर एखाद्याला किती किती वाईट परिस्थितीतून जावे लागते हे हिमांशूसारखा पीडित तरुणच सांगू शकतो.
हेही वाचा