menstrual leave
menstrual leave

Menstrual leave: स्पेनमध्ये ‘मासिक पाळी रजा’ कायदा मंजूर

पुढारी ऑनलाईन: स्पेनमध्ये नुकताच एक कायदा पास करत क्रांतीकारी निर्णय घेण्यात आला आहे. मासिक पाळी दरम्यान रजेची मागणी करणारा कायदा स्पेन सरकारने मंजूर केला आहे. या कायद्याद्वारे स्पेनमधील महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळी दरम्यान पगारी सुट्टी मिळणार आहे. 'मासिक पाळी रजा' (Menstrual leave) कायदा संमत करणारा स्पेन हा पहिलाच युरोपीय देश आहे.

स्पेनमधील संसदेने गुरूवारी (दि.१७) लैंगिक आणि पुनरूत्पादक अधिकार विधेयकांतर्गत (Menstrual leave) या कायद्याला मंजुरी दिली आहे. तसेच या विधेयकांतर्गत १६ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलगी किंवा महिलेला गर्भपात करण्याची परवानगी किंवा मुक्तपणे आपल्या ओळखपत्रावरील जेंडर बदलण्याच्या अधिकारांचा या विधेयकात समाविष्ट करण्यात आला आहे.

स्पेनमध्ये 'मासिक पाळी रजा' (Menstrual leave) या कायद्यांतर्गत मासिक पाळी दरम्यान तीन दिवस कामावर अनुपस्थित राहण्याची परवानगी देतो. तसेच मासिक पाळी दरम्यान तीव्र पेटके येणे, मळमळ, चक्कर आणि उलट्या असा अधिक त्रास देणाऱ्या महिलांना पाच दिवसांपर्यंत अनुपस्थित राहण्याची परवानगी देतो.

हेही वाचा:

logo
Pudhari News
pudhari.news