Meghalaya Election Result 2023 | मेघालयात संगमांचा ‘एनपीपी’ सर्वात मोठा पक्ष, पण स्पष्ट बहुमत नाही

Meghalaya Election Result 2023 | मेघालयात संगमांचा ‘एनपीपी’ सर्वात मोठा पक्ष, पण स्पष्ट बहुमत नाही

Meghalaya Election Result 2023 : मेघालय विधानसभा निवडणुकीत कॉनराड के संगमा यांच्‍या नेतृत्त्‍वाखालील नॅशनल पीपल्‍स पक्ष (एनपीपी) सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. पण इथे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. दुपारी १.३० पर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, एनपीपी पक्षाने ५ जागांवर विजय मिळवला आहे. तर त्यांनी अन्य २१ जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. तर युनायटेड डेमोक्रॅटिक पक्षाने दोन जागा जिंकल्या असून ८ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस एक जागा जिंकून ३ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप ३, तृणमूल काँग्रेस ५ जागांवर आघाडीवर आहे.

मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांचे भाऊ जेम्स पंगसांग के संगमा यांचा दादेंग्रे मतदारसंघात टीएमसीच्या उमेदवार रूपा एम मारक यांनी ७ मतांने पराभव केला. दरम्यान, एका जागेवरील उमेदवाराचा मृत्यू झाल्याने राज्‍यात ६० पैकी केवळ ५९ जागांवर मतदान झाले होते. अशा स्थितीत ५९ जागांचे निकाल लागत आहेत. उर्वरित जागेवर नंतर पोटनिवडणूक होणार आहे. यामुळे राज्यात बहुमतासाठी ३० जागा जिंकणे आवश्यक आहे.

ताज्या कलानुसार मेघालयची वाटचाल त्रिशंकू विधानसभेच्या दिशेने दिसत आहे. दक्षिण तुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा यांनी त्यांच्या पक्षालाच बहुमत मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. "आम्हाला निकालांची चिंता नाही." अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

मेघालयात कोणत्‍याही पक्षाला बहुमत मिळणार नाही, असा दावा एक्‍झिट पोलमधून करण्‍यात आला आहे. मात्र संगमा यांच्‍या नेतृत्त्‍वाखालील नॅशनल पीपल्‍स पार्टीला (एनपीपी) सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज आहे. मेघालय विधानसभा निवडणुकीत एनपीपी, भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह १३ राजकीय पक्ष निवडणूक रिंगणात आहेत. ३७५ उमेदवारांच्‍या भविष्‍याचा फैसला आज स्‍पष्‍ट होत आहे. यामध्‍ये ३६ महिला उमेदवार आहेत. राज्‍यात भाजप आणि काँग्रेसने प्रत्‍येकी ६० उमेदवार उभे केले होते. तर तृणमूल काँग्रेस ५६ मतदारसंघात नशीब अजमावत आहेत. संगमा यांच्‍या नेतृत्‍वाखालील एनपीपीने ५७ , युडीपीने ४६, एनचएसपीडीपीने ११, पीपल्‍स डेमोक्रॅटिक फ्रंटने ९ तर गण सुरक्षा पार्टीने १, गारो नॅशनल कौन्सिल दोन, जनता दल (युनायटेड) तीन उमेदवार उभे केले आहेत.

गेल्या निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता. काँग्रेसचे २१ उमेदवार विजयी झाले होते, तर संगमांच्या 'एनपीपी'चे २० उमेदवार विजयी झाले होते. मात्र, काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष होऊनही सत्तेबाहेर राहावे लागले. भाजपसह इतर काही पक्षांनी 'एनपीपी'ला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले होते. (Meghalaya Election Result 2023)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news