Meghalaya Earthquake: मेघालयातील नॉन्गपोहला भूकंपाचा सौम्य धक्‍का

file photo
file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क: मेघालयातील नॉन्गपोह या शहरात आज (दि.१७) दुपारी पुन्हा सौम्य भूकंपाचा धक्‍का बसला. या भूकंपाची तीव्रता ३.४ रिश्टर सौम्य होती. चार दिवसांपूर्वी (दि. १४ ऑगस्ट) दिवसांपूर्वी मेघालयातील चेरापूंजीजवळ ५.४ रिश्टर तीव्र भूकंपाचा धक्का जाणवला होता (Meghalaya Earthquake), अशी माहिती 'राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रा'ने दिली आहे.

आज दुपारी बसलेल्‍या भूकंपाचा केंद्रबिंदू नॉन्गपोह शहरापासून अति पश्चिमेला ४० किमी अंतरावर, १० किमी खोलीवर होता. या भूकंपाची तीव्रता सौम्य असल्याने कोणत्याही प्रकारची हानी (Meghalaya Earthquake) झालेली नाही.

Meghalaya Earthquake: चार दिवसांपूर्वी चेरापुंजीमध्ये भूकंपाचे धक्के

सोमवारी (दि.१४ ऑगस्ट) दिवसांपूर्वी मेघालयातील चेरापुंजीजवळ ५.४ रिश्टर स्केल तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले होते. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू मेघालयातील चेरापुंजीपासून ४९ किमी दक्षिण-पूर्वेला होता. त्याचे केंद्र पृथ्वीपासून १६ किलोमीटर खोलीवर होते. या भूकंपाची तीव्रता अधिक असली तरी यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली होती.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news