‘मविआ’ची मतं फुटली नाहीत, भाजप अधिक विश्वासार्ह पर्याय वाटल्यानं ती आम्हाला मिळाली – चंद्रकांत पाटील

File Photo
File Photo
पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेली आणि चुरशीची निवडणूक ठरलेल्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी काल गुरुवार दिनांक १० जून रोजी मतदान झाले. धाकधूक, प्रतीक्षा आणि अफवाअंती अखेर आज पहाटे ३.३० च्या सुमारास भाजपने विजयावर शिक्कामोर्तब केल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले. ट्विटमध्ये त्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत एक सुचक वक्तव्य केले आहे. या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, मविआची मतं फुटली नाहीत, तर भाजप अधिक विश्वासार्ह पर्याय वाटल्यानं ती आम्हाला मिळाली!

चंद्रकांत पाटील यांनी विजयानंतर ट्विट करत, सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे आणि शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, राज्यसभा निवडणुकीत तिसरी जागाही जिंकणार, हे आम्ही ठामपणे सांगत होतो. आवश्यक नियोजन करून आम्ही विजय मिळवला, त्याचं श्रेय देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीला आहे. पुढे असेही म्हणाले की, मविआची मतं फुटली नाहीत, भाजप अधिक विश्वासार्ह पर्याय वाटल्यानं ती आम्हाला मिळाली!

आमचे देवेंद्र फडणवीसजी आहेतच तसे! – चंद्रकांत पाटील


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यसभा निवडणूक निकालानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले, 'माणसं आपलीशी करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं आणि त्यांनी चमत्कार घडवला.' यावर चंद्रकांत पाटील ट्विट करत म्हणाले, शरद पवार यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. आमचे देवेंद्र फडणवीसजी आहेतच तसे! प्रतिस्पर्ध्यांच्या यशाचं मनमोकळं कौतुक करणं आणि आणखीही बरंच काही पवारसाहेबांकडून खरोखरच शिकण्यासारखं आहे.
हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news