आळंदीत रंगणार माऊलींचा संजीवन समाधी सोहळा

आळंदीत रंगणार माऊलींचा संजीवन समाधी सोहळा

आळंदी : पुढारी वृत्तसेवा :  आळंदी देवाची (ता. खेड) संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व गाथा भजन सोहळ्याला संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त डॉ. भावार्थ महाराज देखणे व विश्वस्त योगी निरंजननाथजी यांच्या हस्ते गाथा पूजन आणि वीणापूजन करून मंगळवारी (दि. 28) सुरुवात करण्यात आली. 28 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर यादरम्यान हा सोहळा होणार आहे. वीणा मंडपात बृम्हवृंदाच्या मंत्रोच्चारात विधिवत गाथा पूजन, वीणा, पताका, टाळ व पखवाज पूजन विश्वस्तांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महाराज ज्ञानेश्वर माऊलींचा गजर करीत गाथा भजनास सुरवात झाली. यावेळी व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, पालखी सोहळा मालक ऋषिकेश आरफळकर, मानकरी योगीराज कुर्‍हाडे, योगेश आरु, राजाभाऊ चौधरी तसेच आळंदी देवस्थानचे कर्मचारी, वारकरी भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

असे असतील सोहळ्यातील कार्यक्रम
कार्तिक वद्य अष्टमी मंगळवारी (दि. 5 डिसें.) श्रीगुरु हैबतबाबा पायरी पूजनाने कार्तिकी यात्रेची सुरुवात होणार आहे. शनिवारी (दि. 9 डिसें.) कार्तिकी एकादशी व सोमवारी (दि. 11 डिसेंबर) समाधी सोहळा संपन्न होणार आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news