Maruti Suzuki WagonR : मारुती सुझुकीची वॅगन आर आली बाजारात, पहा काय आहे त्यात खास

Maruti Suzuki WagonR
Maruti Suzuki WagonR
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन वृत्तसेवा : जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर भारतीय बाजारपेठेत तुमच्यासाठी अनेक नवीन कार पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्हीदेखील एका चांगल्या तेही कमी बजेटमधील दमदार कारच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने अलीकडेच त्यांची बहुप्रतिक्षित असणारी हॅचबॅक कार मारुती सुझुकी वॅगन आर (Maruti Suzuki WagonR) ही नुकतीच लॉन्च केली आहे.

कशी असेल मारूती वॅगन आर (Maruti Suzuki WagonR)

नवीन मारुती वॅगन आर फेसलिफ्टमध्ये 1.0-लिटर के-सिरीज ड्युअल जेट (K-Series Dual Jet) आणि ड्युअल विविटी (VVT) इंजिन वापरण्यात आले आहे. त्याचबरोबर कंपनीने फॅक्टरी फिट सीएनजी किटसह बाजारात आणलेल्या या कारमध्ये 1.2 लीटर इंजिनचा पर्यायदेखील उपलब्ध केला आहे.

या कारमध्ये असणाऱ्या सुरक्षाविषयक फिचर्स यादेखील आकर्षित कररणाऱ्या आहेत. ड्रायव्हर एअरबॅग (Driver Airbag), प्रवासी एअरबॅग (Passenger Airbag), EBD सह ABS, सीट बेल्ट प्री-टेन्शनर आणि फोर्स लिमिटर्स (Seat Belt Pre-tensioner & Force Limiters ), बजरसह सीट बेल्ट रिमाइंडर (Seat Belt Reminder with Buzzer), स्पीड अलर्ट सिस्टम (Speed Alert System), स्पीड सेन्सिटिव्ह ऑटो डोअर लॉक (Speed Sensitive Auto Door Lock), सुरक्षा अलार्म (Security Alarm ), मागील पार्किंग सेन्सर्स (Rear Parking Sensors), मध्यवर्ती दरवाजा लॉकिंग (Central Door Locking), मुलांकरिता मागील दरवाजासाठीची सुरक्षा (Child Proof Rear Door Lock) या सर्व सुरक्षाविषयक असणाऱ्या फिचर्ससह वॅगन आर सुसज्ज आहे.

या कारचे मायलेज किती?

कंपनीने ही कार फॅक्टरी फिट सीएनजी किटसह लॉन्च केली आहे. कंपनीच्या मते, वॅगन आरचे नवीन सीएनजी माॅडेल ३४.०५ किमी मायलेज देते, जे या कारच्या जुन्या सीएनजी मॉडेलपेक्षा ५ टक्के अधिक आहे.

Maruti Suzuki WagonR ची किंमत किती?

नवीन मारुती वॅगन आर फेसलिफ्टची सुरूवात किंमत 5.39 लाख रुपयांपासून होते. त्याच्या टॉप मॉडेलची किंमत 7.10 लाख रुपये इतकी आहे. त्याचबरोबर सीएनजी मॉडेलची किंमत 6.81 लाख रुपये आहे जी कंपनीच्या मारुती सुझुकी डिझायर सीएनजी कारच्या (Maruti Dzire CNG) किंमतीपेक्षा कमी आहे. Maruti Dzire CNG ची किंमत 8.14 लाख रुपये आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news